For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची होणार झाडाझडती

05:45 PM Jul 19, 2025 IST | Radhika Patil
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची होणार झाडाझडती
Advertisement

सांगली :

Advertisement

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतून आरोग्य सेवा अधिक सक्षमपणे देण्यासाठी आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांची झाडाझडती घेतली जाणार आहे. या तपासणी मोहिमेसाठी नऊ जिल्हास्तरीय अधिकारी व ६५ जिल्हास्तरीय पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजयकुमार वाघ यांनी सांगितले.

आरोग्य विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवा अधिक परिणामकारकपणे राबविण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवरील आरोग्य सेवा, सुविधा, स्वच्छता व नियोजन यांची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी ९ जिल्हास्तरीय अधिकारी व ६५ जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी, सहाय्यकारी पर्यवेक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी आदेशीत करण्यात आले आहे.

Advertisement

आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तेथील आरोग्य सुविधा, मनुष्यबळ, औषधसाठा, रुग्णनोंदणी व रुग्णसेवा यांचे निरीक्षण व आवश्यक मार्गदर्शन करणेचे आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाघ हे स्वतः जिल्हयातील सर्व तालुक्यातील आरोग्य संस्थाना भेटी देतील. अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मिलींद पोरे हे वाळवा, शिराळा, पलूस, कडेगांव व मिरज कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांना भेटी देणार आहेत.

बाल आरोग्य अधिकारी डॉ विवेक पाटील हे जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर व तासगांव या तालुक्यातील आरोग्य संस्थांना भेटी देणार आहेत. या मोहिमेमध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचे काम उद्दिष्ठाच्या १०० टक्के पुर्ण करणे. आरोग्य केंद्रामध्ये व उपकेंद्रामध्ये प्रसुतीचे प्रमाण वाढविणे. आरोग्य संस्थेमधील अंतर्गत व बाहय स्वच्छता, कायाकल्प कार्यक्रमामध्ये सर्व संस्थांचा सहभाग आणि गुणवत्ता याबाबतचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.