महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोककल्प-केएलई आयुर्वेद हॉस्पिटलतर्फे पारवाड येथे आरोग्य शिबिर

10:43 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोककल्प फाऊंडेशन व केएलई आयुर्वेद हॉस्पिटलतर्फे खानापूर तालुक्यातील पारवाड येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीने दत्तक घेतलेल्या 32 गावांपैकी पारवाड गावात आयोजित कार्यक्रमात आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी 60 व्यक्तींनी हजेरी लावली. सोसायटीचे संस्थापक किरण ठाकुर हे ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत. पारवाड गावासह 32 गावांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी, त्यांना जीवनावश्यक वस्तू आणि मदत पुरविण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. या शिबिरातही अनेक उपस्थितांनी आयुर्वेदाचे फायदे जाणून घेतले. केएलई आयुर्वेदतर्फे पीआरओ श्रीधर आणि डॉक्टरांचे पथक तसेच लोककल्पचे सूरजसिंग राजपूत, सुहास पेडणेकर, सुहासिनी पेडणेकर, अनंत गावडे उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article