For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आपत्तीच्या काळात विभागप्रमुखांनी मुख्यालय सोडू नये; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

06:21 PM Jul 20, 2024 IST | Abhijeet Khandekar
आपत्तीच्या काळात विभागप्रमुखांनी मुख्यालय सोडू नये  जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश
Collector Amol Yedge
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळी जवळ म्हणजेच 36 फुटांवर आहे. पावसाचा जोर असल्यामुळे पाणी इशारा पातळीकडे सरकत आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करुन प्रशासकीय यंत्रणेने सतर्क रहावे. विभागप्रमुखांनी या आपत्कालीन परिस्थितीत मुख्यालय सोडू नये असे निर्देश सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.

Advertisement

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने नियोजन बैठक झाली.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, गृह विभागाच्या पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व जिल्हास्तरीय अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

यावेळी तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याकडून तालुका निहाय पावसाचे प्रमाण, संभाव्य पूर परिस्थिती व केलेल्या नियोजनाची माहिती घेऊन सूचना केल्या. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास व्यक्ती आणि जनावरांचे वेळेत स्थलांतर करण्यासाठी तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी चोख नियोजन करा.कोणत्याही परिस्थितीत जिवीत हानी होणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना करुन मान्सून परिस्थितीत सर्व विभाग प्रमुखांनी मुख्यालय सोडू नका, असे निर्देश दिले.

Advertisement

आपत्कालीन विभागाने उपलब्ध सर्व साधनसामग्री सज्ज ठेवावी. जिह्यातील स्वयंसेवकांची पथके व एनडीआरएफचे पथक सज्ज ठेवावे. नागरिकांना पुरस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रशिक्षित बचाव पथके तयार ठेवा. मान्सून काळात रस्ते व पूल पाण्याखाली जातात, अशावेळी नागरिकांकडून पूल ओलांडताना दुर्घटना घडू नये, यासाठी पुराचे पाणी आलेले रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करुन या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवा. पूरपरिस्थितीमुळे बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांपर्यंत व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे तात्काळ माहिती पोहोचवा. वीज पुरवठा खंडित झाल्यास त्वरित पूर्ववत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्री तयार ठेवा.

पूर परिस्थितीमुळे पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता असणाऱ्या गावांना मदतकार्य जलद पोहोचवा. स्थलांतरित नागरिकांसाठी पुरेसे अन्नधान्य व औषधसाठा उपलब्ध ठेवा. पूरस्थितीत एकही जनावर वाहून जाऊ नये, यासाठी चोख नियोजन करा. छावणीतील जनावरांसाठी पुरेसे पशुखाद्य, ओला व सुका चारा, औषधसाठा तयार ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी केल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी तालुका निहाय व गाव निहाय केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाची माहिती दिली.

Advertisement
Tags :

.