आठ महिन्यांपासून खात होता केवळ मांस, लोणी अन् पनीर
शरीराची झाली वाईट अवस्था
फ्लोरिडातील एका 40 वर्षीय इसमाने स्वत:च्या आहारात केवळ मांस, लोणी आणि पनीर सामील करून 8 महिन्यांपर्यंत ‘कार्निवोर डायट’ अवलंबिला. सातत्याने असा आहार घेतल्यावर त्याच्या प्रकृतीवर पडलेला प्रभाव पाहून डॉक्टरांना धक्का बसला आहे.
टाम्पाच्या रुग्णालयात एका व्यक्तीवर उपचार करण्यात आले आहेत. त्याच्या तळहात, कोपर अन् पायांच्या तळव्यांमधून पिवळ्या रंगाच्या डागांमधून तरल पदार्थ बाहेर पडत होतो. डॉक्टरांनी केलेल्या चौकशीत या व्यक्तीने आपण दररोज लोणीची पूर्ण स्टिक, 6-9 पाउंड पनीर अणि हॅमबर्गर पॅटीज खात होतो असे सांगितले होते. हे प्रकरण आता जामा कार्डियोलॉजी नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.
कार्निवार डायट म्हणजे काय?
कार्निवोर डायट केवळ पशू उत्पादने म्हणजेच मांस, अंडी आणि डेअरी उत्पादनांवर आधारित आहे. या आहाराने वजन कमी होते आणि ऊर्जापातळी तसेच मानसिक क्षमतेत सुधारणा होते असा दावा काही लोक करतात. या व्यक्तीने या डायटचे टोक गाठले आहे. या डायटने वजन कमी झाले आणि ऊर्जा पातळी तसेच मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा झाल्याचा दावा त्याने केला. परंतु त्याच्या त्वचेवर याचा नकारात्मक प्रभाव पडला आहे.
प्रमाणापेक्षा वाढले कोलेस्ट्रॉल
संबंधित व्यक्तीचा कोलेस्ट्रॉलचा स्तर 1000 एमजी/डीएलपेक्षा अधिक झाला होता, सामान्य कोलेस्ट्रॉल स्तर 200 एमजी/डीएल पेक्षा कमी असतो. तर 240 एमजी/डीएलला उच्च स्तर मानले जाते. त्याच्या जैंथेलास्मा नावाच्या स्थितीचे निदान झाले असून जी उच्च कोलस्ट्रॉल किंवा रक्तता वसाच्या अधिक स्तरामुळे निर्माण होते. या सिथतीत अतिरिक्त वसा रक्त वाहिन्यांपासून गळती होत शरीराच्या विविध भागांमध्ये जमा होतो.
कार्निवोर डायटचा प्रभाव
डॉक्टरांनी या प्रकरणाला आहार पॅटर्नच्या लिपिड स्तराचा प्रभाव आणि हायपरकोलेस्ट्रोलेमियाच्या व्यवस्थापनाचे महत्त्वाचे उदाहरण म्हणून सादर केले. अमेरिकन कृषी विभागाच्या आहार दिशानिर्देशांनुसार एका संतुलित आहारात दररोज 2.5 कप भाज्या, 2 कप फळं, 6 कप धान्य, 3 कप डेअरी उत्पादने, 5 ग्रॅम तेल आणि काही प्रमाणात मांस असावे.
कार्निवोर डायचा धोकादायक ट्रेंड
सीडीसीने देखील कार्निवोर डायटचे समर्थन केलेले नाही. फळे, भाज्या आणि धान्यांयच विविध स्रोतांना आहारात सामील करावे असे सीडीसीने म्हटले आहे. परंतु काही लोक कार्निवोर डायटचा प्रचार-प्रसार करतात.