महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विमानात करत होता जादूटोणा

06:01 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गुडलकसाठी इंजिनात टाकली नाणी

Advertisement

अनेक लोक गुड लक आणि बॅड लकला प्रचंड मानतात. याचमुळे गुड लकसाठी अनेक प्रकारचे मार्ग अवलंबिले जातात. एका व्यक्तीने जादूटोण्याची मदत घेतल्याने इतर लोकांना त्रास सहन करावा लागला आहे. त्याने विमानाच्या इंजिनातच नाणी टाकली आहेत. यामुळे उ•ाणात 4 तासांचा विलंब झाला आहे. चायना साउथर्न एअरलाइन्सचे विमान सान्या येथून बीजिंगसाठी सकाळी 10 वाजता उ•ाण करणार होते. तर विमान 2 वाजून 16 मिनिटांनी लँड होणार होते, परंतु असे घडू शकले नाही.

Advertisement

या घटनेचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. फ्लाइट अटेंडेंटने एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले आहे. संबंधित व्यक्तीने इंजिनात नाणी टाकली होती. आपण 3-5 नाणी टाकलयाची कबुली त्याने दिली. एअरक्राफ्ट मेंटेनेन्स स्टाफने व्यापक सुरक्षा निरीक्षण पेल, त्यानंतर कुठलीच सुरक्षा समस्या नसल्याचे स्पष्ट झाल्याचे एअरलाइनच्या कस्टमर सर्व्हिसकडून सांगण्यात आले.

एअरलाइन्सने लोकांच्या अशा कृत्यांबद्दल इशारा जारी केला आहे. विमानात नाणी फेकल्याने विमानो•ाण सुरक्षेला धोका होऊ शकतो आणि याकरता वेगवेगळ्या स्तराची शिक्षा दिली जाणार असल्याचे म्हटले गेले आहे. अशाप्रकारचे कृत्य लोक गुड लकसाठी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये चायना साउथर्न एअरलाइन्सकडून संचालित एका उ•ाणात एका प्रवाशाने कथित स्वरुपात नाणी उडविली होती. यामुळे उड्डाणात विलंब झाला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article