Kolhapur सरूड परिसरातील वारणा नदीपात्रात मगरीचा वावर
त . भा . वार्ताहर
सरूड परिसरातील वारणा नदीपात्रात पूर्ण वाढ झालेल्या मगरीचा वावर आढळून आला आहे . या नदीपात्रात वारंवार मगरीचा वावर आढळून येत असल्याने येथील शेतक्रयांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .
शुक्रवारी येथील मनिष तडवळेकर यांच्या शेती वीज पंपाच्या शेजारी ही मगर आढळून आली . शेती वीज पंप नदीवर गेलेल्या शेतक्रयांची चाहुल लागताच ही मगर नदी पलिकडील सागाव गावच्या जॅकवेलकडे गेली .
तेथुन ती नदी पात्राबाहेरच्या मोकळ्या जागेत गेली . दोन दिवसा पुर्वी याच परिसरात येथील शेतक्रयांना एक लहान मगर दिसून आली होती . गेल्या आठवड्यात तीन वेळा या परिसरात मगर दिसून आली आहे . अलिकडच्या काळात सरुड परिसरातील वारणा नदी पात्रात मगरींचे वारंवार वावर आढळून येत असल्याने या परिसरात मगरीची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे . अनेक वेळा या मगरी नदीपात्राबाहेर येऊन मोकळया जागेत पडुन राहत आहे . त्यामुळे येथील शेतक्रयांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे