Crime News | बाळूमामाच्या मेंढरांचे दर्शन घडवतो म्हणाला अन् ५६ हजारांचे दागिने लंपास!
01:36 PM Aug 25, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
मिरज: गावाजवळ आलेल्या बाळूमामाच्या मेंढरांचे दर्शन करवून देतो, असे सांगून एका भामट्याने महिलेला दुचाकीवरुन बसवून नेते तिच्याकडील ५६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुबाडले. तालुक्यातील बेळंकी येथे ही घटना घडली. याप्रकरणी सावंत बिरा यंगारे (वय ५०, रा. पेट्रोल पंपाजवळ, बेळंकी) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
Advertisement
बेळंकी येथे एका किराणा दुकानासमोरुन सावंत यंगारे यांच्या आई पायी जात होत्या. यावेळी एक अनोळखी तरुण दुचाकीवरुन आला. त्याने गावाजवळ बाळूमामाची मेंढरे आली आहेत. तुम्हाला दर्शन करवतो. माझ्या दुचाकीवरुन चला. परत आणून सोडतो, असे सांगून सोबत नेले. त्यानंतर बोलण्याच्या नादात गुंतवून त्यांच्याकडील ५६ हजार रुपये किंमतीचे सोन्याची बोरमाळ काढून घेतली.
Advertisement
Advertisement