For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फिलिपाईन्सला भूकंपाचा धक्का

06:47 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
फिलिपाईन्सला भूकंपाचा धक्का
Advertisement

वृत्तसंस्था / मनिला (फिलिपाईन्स)

Advertisement

फिलिपाईन्स या देशाला भूकंपाचा धक्का बसला आहे. रिष्टर परिमाणावर या भूकंपाची तीव्रता 6.0 इतकी नोंदण्यात आली आहे. या भूकंपात जीवीत हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, स्थावर मालमत्तेची पडझड काही स्थानी झाली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार भूकंपाचा प्रथम धक्का बुधवारी दुपारी साधारणत: सव्वाबारा वाजता बसला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू मोरो गल्फ विभागात असून तो फिलिपाईन्सच्या मुख्य भूमीपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. भूकंपामुळे त्सुनामीची शक्यता नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

फिलिपाईन्स या देशाला नेहमीच भूकंपाचे धक्के बसतात. हा देश पृथ्वीवरच्या सर्वाधिक भूकंपप्रवण क्षेत्रात आहे. दोन खंडीय भूप्रस्तर एकमेकांना च्या रेषेवर जुळतात त्या रेषेवरच या देश स्थित आहे. त्यामुळे भूमीअंतर्गत प्रस्तरीय हालचाली मोठ्या प्रमाणात घडत असल्याने या देशाला भूकंपाचा नेहमीच मोठा धोका असतो. दोन खंडीय भूप्रस्तर गेल्या लाखो वर्षांपासून एकमेकांना ढकलत आहेत. त्यांच्या घर्षणाने भूभीच्या अंतर्भागात प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असून ती ऊर्जा भूकंपाच्या माध्यमातून बाहेर पडत असते. हे सततच्या भूकंपांचे मुख्य कारण आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.