For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कालियुगातील भोंदुगिरी !

03:20 AM Apr 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
कालियुगातील भोंदुगिरी
Advertisement

श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी! स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास नसल्याने अनेकजण कलियुगातील भोंदूबाबांच्या अमिषाला बळी पडत चालले आहेत.  लोकांच्या याच असहाय्यतेचा फायदा उचलत त्यांना भीती घालत कलियुगातील या भोंदूबाबांनी अक्षरशहा उच्छाद मांडला आहे. याला वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. अन्यथा अनेकजण याला बळी पडतील तर दुसरीकडे या भोंदूबाबांची पैदास वाढत जाईल.

Advertisement

मानसशास्त्रानुसार मानवी प्रयत्नांची मर्यादा संपते, तिथे अंधश्रद्धा किंवा आंधळा विश्वास सुऊ होतो. तेथूनच चलती होते ती कलियुगातील भोंदुगिरींची. कोणी हातातून सोन्याची साखळी काढतो तर कोणी भविष्य बदलण्याची भाषा करतो. वास्तविक या भोंदूंना स्वत:च्या भविष्याची कल्पना नसते ते इतरांच्या भविष्याबद्दल वल्गना करीत असतात. सध्या राज्यात गाजत असलेला अशोक खरात नावाच्या भोंदूबाबाला तरी त्याच्या भविष्याची कुठे कल्पना होती की काही दिवसांत त्याच्या मुसक्या आवळल्या जातील. तो इतरांचे भविष्य सांगत फिरत होता. याच भविष्याच्या जोरावर अनेक लेकी-बाळींचे संसार त्याने उधळून लावले. तर कित्येक जणींना आपल्या वासनेचा बळी बनविले. राज्यात अशोक खरातसारखा एकच भोंदूबाबा नाही. असे अनेक भोंदूबाबा आहेत जे स्वत:ला देव-देवतांचे अवतार असल्याचे सांगत लोकांचे आयुष्य उधळत चालले आहेत. कलियुगातील अशा भोंदूचा आणि त्यांच्या भोंदूगिरीचा काळा इतिहास पाहिला तर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत.

एकनाथ खरात ऊर्फ कॅप्टन 10 वी नापास असलेला हा नीच, दुष्ट, अधम माणूस स्वत: नौदलाचा जवान असल्याचे सर्वांना सांगत होता. खाजगी जहाजावर खलाशी असलेल्या अशोक खरातने दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत आपला राजकीय दबदबा ठेवला होता. काळी जादू आणि अंकशास्त्राचे त्याला ज्ञान असल्याने त्याचा फायदा त्याने लेकी बाळींचे आयुष्य उखडण्यासाठी उठविला. अशावेळी त्याने कुटुंबेच्या कुटुंबे उधळून लावली. जादूटोणा आणि अघोरी तंत्रमंत्र विद्येच्या जोरावर त्याने महिलांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले. महाविकास आघाडीच्या काळातील काही मंत्र्यांना तसेच आयएएस आदी अधिकाऱ्यांना हाताशी घेत त्याने   आपल्या नावावर नाशिक जिह्यात हजारो कोटी ऊपयांची मालमत्ता उभी केली. जो त्याच्या विरोधात बोलेल त्याला तो बलाचा वापर करीत शांत करीत होता. एवढेच नाही तर अशोक खरातच्या कार्यालयात राजकीय प्रस्थांची सेटींगदेखील लावली जात होती. केवळ भोंदूगिरीच नाही तर दलालाची कामगिरी देखील हा बाबा उत्तमरित्या निभावत होता.

Advertisement

मात्र कधी कधी आपल्या वागण्याने किंवा कार्याने जवळचे देखील दुखावले जातात. यामुळे जवळचेच घात करतात. तसाच घात या बाबाचा त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या तरूणाने केला. करोडो ऊपये कमाविणाऱ्या बाबाने केवळ तुटपुंज्या पगारावर एका तरूणाला कामाला ठेवले. एवढेच नाही तर या बाबाची वासनांध नजर तरूणाच्या पत्नीवर पडली. गर्भवती असलेल्या तरूणीचा उपभोग घेऊनच त्याचा आत्मा शांत झाला. मात्र याची माहिती तरूणाला समजताच त्याने बाबाचा बदला घेण्यासाठी सर्व कार्यालयात छुपे कॅमेरे लावले. अगदी थोड्या दिवसांतच बाबांच्या सर्व काळ्या लीला या तरूणाच्या हाती आल्या. येथुनच सुऊ झाला तो अशोक खरात याचा पडता काळ. पापाचा घडा एकदा का भरला की माणसाला उतरती कळा लागते. तसा या अशोक खरातचा पडता काळ सुऊ झाला. कलियुगातल्या भोंदू बाबाने अनेकांची आयुष्ये उधळवून लावली. जे काही कमाविले आहे, ते एका क्षणात मातीमोल होण्यास सुऊवात झाली आहे. केवळ हा भोंदूबाबा  कालकोठडीच्या बाहेर पडू नये. कारण जेवढ्या भोंदूबाबांना आत्तापर्यंत गजाआड केले आहे. ते सर्व जामिनाच्या नावावर बाहेर येऊन पुन्हा छुप्प्या पद्धतीची मजा करीत आहेत.

गुजरातच्या आसाराम बापूचे आजही कोंटीच्यावर अनुयायी असून, आमचे बापू निर्दोष असल्याचा प्रचार करीत आहेत. आसाराम बापू गजाआड असताना देखील त्यांच्या नावाने देशभ़रात कार्यक्रम आयोजीत केले जात आहेत. जेलमध्ये आसाराम बापूचे सत्संग कार्यक्रम सुऊ झाले आहेत. या बापूने कित्येक महिलांनाच नाही तर अगदी विदेशी असलेल्या कोवळ्या मुलींना नासविले. त्यानेच नाही तर त्याच्या मुलाने देखील तेच केले. तरी देखील बापूच्या अनुयायांना आजही बापू निर्दोष वाटत आहे. आसाराम बापूला जामिन मिळावा म्हणून मोठ-मोठे वकील सर्वोच्च न्यायालयाच्या पायऱ्या झिजवित आहेत. तर दुसरीकडे देशात देव-देवतांचे, संतांचे अवतार असल्याचे सांगत अनेकांची फसवणूक सुऊ आहे. सर्व भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले आदमापूर येथे बाळूमामाचे देवस्थान आहे. या बाळूमामाचा आपण अवतार असल्याचे सांगत मनोहर भोसले उर्फ मनोहरमामा या पुणे जिह्यातील इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावात राहणाऱ्या भोंदूने अनेकांना गंडविले. स्वत: बेरोजगार असलेल्या मनोहर भोसलेने आपल्या अंगात बाळूमामा संचारत असल्याचा कांगावा करीत अनेकांवर अन्याय, अत्याचार केले. एवढेच नाही तर अनेकांची फसवणूक करीत मालमत्ता हडपण्याचा प्रकार केला. मात्र वेळीच याप्रकरणी गुन्हा दाखल होत या भोंदूबाबाला अटक करण्यात आली.

एक काळ पंजाबच्या गुरमीत रामरहीम सिंग या भोंदूबाबाने तर देश-विदेशात थैमान घातले होते. स्वत: त्याने चित्रपटाची भूमिका करत यामध्ये मुख्य भूमिका निभावली होती. कधी हा बाबा क्रिकेट खेळत असे तर कधी बाईक रायडींग करीत असे. याचा आश्रम पाहिला तर एक भूलभुलैय्या होता. याची स्वत:ची एक अशी तळघरात गुप्त खोली होती. या खोलीतच त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले होते. ज्यावेळेस याच्यावर गुन्हा दाखल झाला. तेव्हा अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर देखील येथील नागरिकांनी हल्ला केला होता. मात्र अर्धी कुमक मागवित या बाबाच्या अखेर मुसक्या आवळल्या. कलियुगातील या भोंदूबाबांच्या काळ्या लिलयांना वेळीच आवर घालणे आवश्यक आहे.

अमोल राऊत

Advertisement
Tags :

.