Kolhapur News | लग्नाच्या गोंधळासाठी आला अन् काळाने झडप घातली! महागावमध्ये शेततळ्यात बुडून मुंबईच्या तरुणाचा मृत्यू
महागाव-वैरागवाडी रस्त्यावरील शेततळ्यात घडली दुर्दैवी घटना
महागाव -महागाव (ता. गडहिंग्लज) येथील महागाव-वैरागवाडी रस्त्यावरील काजू फॅक्टरी जवळ असलेल्या सोमनाथ जाधव यांच्या शेततळ्यामध्ये तरुणााचा बडून दुर्देवी मृत्यू झाला. अंकुश दिपक बेंडल (वय २४, मूळगाव-रत्नागिरी, सध्या रा. मुंबई) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेची नोंद गडहिंग्लज पोलिसात झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महागावातील बाळू जाधव यांची बहीण शालन कदमयांच्या मुलासोबत अंकुश बेंडल यांच्या बहिणीचा विवाह झाला होता. विवाहानंतर महागावाला गोंधळाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी अंकुश बेंडल महागावला आला होता. मंगळवारी सकाळी १० वाजता गारगोटीतील बहिणीच्या ओळखीच्या घरी आला. तेथून तो महागावला दुचाकीवरून आला. घरात गोंधळ कार्यक्रमाची तयारी सुरू असताना दुपारी उन्हाचा पारा बाढल्याने शरीराची लाहीलाही होत होती. त्यामुळे अंकुश हा आपल्या दुसऱ्या बहिणींसोबत सोमनाथ जाधवाच्या शेतातील शेततळ्यामध्येपोहण्यासाठी गेला होता.
शेततळ्यामध्ये पोहताना त्याला दम लागून बुडाला. बहिणींनी आरडाओरडा करून रस्त्यावरून जाणाऱ्यांना बोलावले. युवकांनी तलावात उडी मारून शोध घेतला व मृतदेह बाहेर काढला. सदर घटनेची माहिती पोलीस पाटील विनिया सावंत यांनी गडहिंग्लज पोलिसांना दिले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शविच्छेदनासाठी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.