एचडीएफसी बँकेला तिमाहीत 19,221 कोटीचा नफा
वृत्तसंस्था, मुंबई
देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी यांनी आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीचा निकाल घोषित केला असून नफा 9 टक्के वाढत 19,221 कोटी रुपयांवर पोहचला आहे. 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या तिमाहीत सदरचा नफा कंपनीने नेंदवला असून मागच्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 17,616 कोटी रुपयांचा होता.
उत्पन्न, महसूल
कंपनीचे उत्पन्न 3.2 टक्के वाढत 33,080 कोटी रुपयांवर पोहचले आहे. याचदरम्यान बँकेने सदरच्या तिमाहीत 5 टक्के वाढीसोबत 46,280 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान अवधीत 44,090 कोटी रुपयांचा महसूल बँकेने प्राप्त केला आहे.
लाभांश किती
बँकेने आर्थिक वर्ष 2026 साठी 13 रुपये प्रति समभाग अंतिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. यासाठी रेकॉर्ड डेट 19 जून 2026 ही निश्चित करण्यात आली आहे. याआधी ऑगस्ट 2025 मध्ये 2.5 रुपये प्रति समभाग विशेष अंतरिम लाभांश बँकेने दिलेला आहे.