‘एचडीबी फायनान्स’चा आयपीओ खुला
12,500 कोटीचा राहणार आयपीओ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसचा आयपीओ मंगळवार, 25 जूनपासून सबक्रिप्शनसाठी खुला झाला आहे. हा या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आहे. ही कंपनी देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेची उपकंपनी आहे.
आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी-
या आयपीओ अंतर्गत, कंपनी 700 ते 740 प्रति शेअर किंमत पट्टामध्ये शेअर्स ऑफर करत आहे. प्रत्येक शेअरचे दर्शनी मूल्य 10 आहे. कंपनीचे बाजार मूल्यांकन 61,000 कोटींपेक्षा जास्त असेल.
शेअर अलॉटमेंट: शेअर्सचे अलॉटमेंट सोमवार, 30 जून रोजी ठरवले जाईल.
परतावा: ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स मिळाले नाहीत त्यांना मंगळवार, 1 जुलैपासून परतफेड मिळण्यास सुरुवात होईल.
शेअर मार्केट लिस्टिंग: एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स बुधवार, 2 जुलै रोजी बीएसई आणि एनएसई वर सूचीबद्ध केले जाणार आहेत.
आयपीओ उघडण्यापूर्वी कंपनीने अँकर इन्व्हेस्टर्सकडून 3,300 कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे. यामध्ये एलआयसी, गोल्डमन सॅक्स, ब्लॅकरॉक आणि 22 देशांतर्गत म्युच्युअल फंडांचा समावेश आहे. गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची माहिती
गुंतवणूकदार किमान 20 शेअर्सच्या एका लॉटमध्ये अर्ज करू शकतात. त्यानंतर तुम्ही 20 च्या पटीत अतिरिक्त बोली लावू शकता. आयपीओ शुक्रवार, 27 जून रोजी बंद होणार आहे.
ऑफरमध्ये काय आहे
हा आयपीओ दोन भागात विभागला गेला आहे. 2,500 कोटींचा नवीन इश्यू जारी केला जात आहे, म्हणजेच हा पैसा कंपनीच्या वाढीसाठी वापरला जाईल. याशिवाय, 10,000 कोटींची विक्री एचडीएफसी बँकेद्वारे ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे केली जाईल.