महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांच्यावर हजारो महिलांच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल!

05:23 PM Apr 29, 2024 IST | Abhijeet Khandekar
Prajwal Revanna
Advertisement

अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि जनता दल सेक्युलरचे हसन लोकसभेचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने विशेष चौकशी पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याच्या काही तासांतच एका पिडीत महिलेने दिलेल्या जबाबामुळे पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला आहे.

Advertisement

देशभरासह कर्नाटक राज्यातही लोकसभा निवडणुकीसाठी आरोप प्रत्यारोप होत असताना एनडीए आघाडीमध्ये सामिल असलेल्या जनता दल सेक्युलर पक्षाला आता मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू असलेला आणि हसन या लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असलेल्या प्रज्वल्ल रेवण्णा याचे शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडीयो काढल्याप्रकरणात नाव आले आहे. या प्रकरणामुळे कर्नाटकात राजकारण चांगलेच तापले असून अनेक सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून राज्यसरकारकडे कारवाईची मागणी केली आहे.

Advertisement

प्रज्वल रेवण्णा हा सध्या देश सोडून जर्मनीला पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पुढे आलेल्या महिला तक्रारदाराने इतर महिलांच्या व्हिडीयो क्लीप पाहून समोर येण्याचं धाडस दाखवलं. आपली तक्रार नोंदवताना तीने आपल्यावर 2019 ते 2022 दरम्यान प्रज्वल रेवण्णा कडून अत्याचार झाल्याचं सांगितलं. त्यानंतर होलेनारसीपुरा पोलिसांनी याप्रकरणी दखल घेऊन गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार महिलेसह इतर महिलांची तक्रार आणि प्रज्वलविरुद्ध दाखल केलेला एफआयआर अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडे जाईल. टीममध्ये आयपीएस अधिकारी सुमन डी. पेणेकर आणि सीमा लाटकर यांचा समावेश आहे.

यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी, एसआयटीला या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल येऊ द्या. जर तो दोषी असेल तर त्याची शिक्षा त्याला मिळालीच पाहीजे. अशी प्रतिक्रिया दिली.

Advertisement
Tags :
HD Deve GowdaKarnataka PoliticsPrajwal Revanna
Next Article