For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एचसीएल’चा नफा वाढला

06:06 AM Jul 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘एचसीएल’चा नफा वाढला
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

माहिती तंत्रज्ञान डेटा कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीजने आर्थिक वर्ष 2026-27 (एप्रिल-जून) मध्ये दमदार कामगिरी नोंद केली आहे. कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक 20 टक्केहून अधिक वाढत 4,624 कोटी रुपयांवर पोहचला आहे. कंपनीने ही माहिती दिली आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीने 3843 कोटी निव्वळ नफा कमावला होता. याचदरम्यान कंपनीच्या संचालक मंडळाने 12 रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. 17 जुलै ही यासाठी रेकॉर्ड तारीख सांगण्यात आली आहे.

याचदरम्यान महसुल 4 टक्के वाढत 34579 कोटी रुपयांवर पोहचला आहे. मागच्या वर्षी याच अवधीत 30,349 कोटी रुपयांवर महसूल राहिला होता. एचसीएल टेकने एकंदर 2.4 अब्ज डॉलर्सच्या मूल्याची ऑर्डर प्राप्त केली आहे. याव्यतिरीक्त अलीकडेच 1.14 अब्ज डॉलर्सचे कंत्राट मर्सीडिझ बेंझसोबत एआयसंदर्भात प्राप्त झाले आहे.

Advertisement

एचसीएल टेक्नॉलॉजी अध्यक्षा, रोशनी नाडर मल्होत्रा म्हणाल्या, ‘आमच्या वैशिष्ट्यापूर्ण पोर्टफोलिओद्वारे, आम्ही त्यांच्या व्यावसायिक धोरणांना ग्राहकांना तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मदत करू शकत आहोत. आम्ही आमच्यात सुधारणा तंत्रज्ञान तंत्रज्ञान कौशल्य वृध्दी आणि संपूर्णपणे आय समाविष्ट करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.’

Advertisement
Tags :

.