कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एचसीएलचे नाडर बनले पुन्हा सर्वाधिक दानशूर

06:58 AM Nov 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दररोज 7.4 कोटी रुपयांचे दान : रिलायन्सचे मुकेश अंबानी दुसऱ्या स्थानी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मागील वर्षी भारतातील 191 श्रीमंत व्यक्तींनी 10,380 कोटी रुपयांचे दान केले. एडेलगिव्ह-हुरुन इंडिया परोपकारी यादी-2025 नुसार एचसीएल टेकचे संस्थापक शिव नाडर हे पुन्हा एकदा देशातील अव्वल परोपकारी म्हणून उदयास आले आहेत. गेल्या वर्षी दररोज सरासरी 7.4 कोटी रुपयांचे दान करण्यात आले. वर्षभरात एकूण 2,708 कोटी रुपयांचे दान देण्यात आल्याची माहिती आहे. रिलायन्सचे मुकेश अंबानी दुसऱ्या आणि बजाज ग्रुप तिसऱ्या क्रमांकावर होते. अदानी पाचव्या क्रमांकावर आहेत. टॉप देणगीदारांच्या यादीत 24 महिला आहेत. इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांच्या पत्नी रोहिणी निलेकणी अव्वल आहेत. त्यांनी 204 कोटी रुपयांचे दान दिले.

बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ 83 कोटी रुपयांच्या देणगीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याच वेळी, जेरोधाचे निखिल कामत (39) आणि नितीन कामत (46) हे सर्वात तरुण दानशूरांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी 147 कोटी रुपये दान केले. दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या बिन्नी बन्सल (42) यांनी 18 कोटी रुपये दान केले.

इन्फोसिसने नवीन विक्रम रचला

इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि त्यांच्या कुटुंबियांनी एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. नंदन नीलेकणी, क्रिस गोपालकृष्णन, के. दिनेश, रोहिणी नीलेकणी आणि कुमारी शिबुलाल यांनी या वर्षी एकत्रितपणे 850 कोटी रुपयांपेक्षा जास्त देणगी दिली. या कंपनीशी संबंधित हे सर्वात मोठे दान आहे.

रिलायन्सने सीएसआर अंतर्गत 1,309 कोटी रुपये दान केले.

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत सर्वाधिक 1,309 कोटी रुपये दान केले. हे अनिवार्य खर्चापेक्षा 261 कोटी रुपये जास्त आहे. रुंगटा सन्सने 181 कोटी रुपयांचा सीएसआर केला, जो प्रत्यक्ष खर्चापेक्षा 114 कोटी रुपये जास्त होता. जिंदाल स्टील अँड पॉवरने सीएसआरवर 267 कोटी रुपये खर्च केले, जे त्यांच्या निश्चित खर्चापेक्षा 100 कोटी रुपये जास्त आहे.

या यादीनुसार, देणगीदारांच्या यादीतील टॉप 10 सेलिब्रिटींनी एकूण 4,625 कोटी रुपयांचे दान केले होते, जे यादीतील एकूण देणग्यांच्या सुमारे 53 टक्के होते. कृष्णा चिवुकुला आणि सुस्मिता व सुब्रतो बागची यांनी यादीत 7 वे आणि 9 वे स्थान पटकावले. टॉप 10 देणगीदारांपैकी 6 जणांनी त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत जास्त पैसे दिले होते.

वैयक्तिक देणगीमध्ये नाडर परिवार अव्वल स्थानी

नाडर आणि त्यांचे कुटुंब वैयक्तिक देणगी यादीतही अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी वैयक्तिक देणगी म्हणून 2,537 कोटी रुपये दान केले. इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी आणि त्यांची पत्नी रोहिणी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 356 कोटी आणि 199 कोटी रुपये दान केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article