For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

एचसीएल टेकचा नफा 21 टक्क्यांनी वधारला

06:29 AM Oct 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
एचसीएल टेकचा नफा 21 टक्क्यांनी वधारला
Advertisement

मुंबई : एचसीएल टेकमध्ये 2.30 लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. आयटी कंपनी एचसीएल टेकचा दुसऱ्या तिमाहीतील निव्वळ नफा वार्षिक आधारावर 21 टक्क्यांनी वाढून 5,132 कोटींवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 4,235 कोटी रुपयांचा होता. तर त्यापूर्वीच्या तिमाहीत तो 4,624 कोटी होता. म्हणजेच, कंपनीचा निव्वळ नफा तिमाही आधारावर 11 टक्क्यांनी वाढला आहे.

Advertisement

डिजिटल, इंजिनिअरिंग, क्लाउड आणि सॉफ्टवेअर या विभागांमधील उत्तम कामगिरी आणि ऑर्डर मिक्समुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. एचसीएलने सोमवारी आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. एचसीएल टेकचा महसूल 11.5 टक्क्यांनी वाढून 35,620 कोटी रुपयांवर पोहचला आहे.

एचसीएल टेकच्या संचालक मंडळाने भागधारकांना प्रति शेअर 12 रुपयांचा लाभांश देण्यासही मंजुरी दिली आहे. कंपन्या आपल्या भागधारकांना नफ्यातील काही वाटा देतात, ज्याला लाभांश म्हणतात. कंपनी डिजिटल, क्लाउड आणि एआय सोल्युशन्स क्षेत्रात आपली पोहोच वाढवण्यावर आणि नवीन जागतिक ऑर्डर्स मिळवण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित करत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.