एचसीएल टेकचा नफा 11 टक्क्यांनी घसरणीत
06:16 AM Jan 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
Advertisement
आयटी कंपनी एचसीएल टेकचा तिसऱ्या तिमाहीत एकूण महसूल 34,257 कोटी रुपये होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत 12.80 टक्के अधिक आहे. कंपनीचे कामकाजातून उत्पन्न 33,872 कोटी रुपये होते. त्याच वेळी, जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च रु. 27,792 कोटी होता आणि त्यांनी एकूण रु. 1,427 कोटी कर भरला. एकूण उत्पन्नातून खर्च आणि कर वजा करून कंपनीने तिसऱ्या तिमाहीत 4,076 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. वार्षिक आधारावर ही 11.21 टक्क्यांची घट आहे.
गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 4,591 कोटी रुपयांचा नफा झाला होता. एचसीएल टेकने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. तुमच्याकडे एचसीएल टेकचे शेअर्स असल्यास, कंपनीच्या बोर्डाने शेअरधारकांना प्रति शेअर 12 रुपये अंतरिम लाभांश देण्याचे जाहीर केले आहे.
Advertisement
Advertisement