For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कडोलीत आगीत गवतगंजी खाक

11:11 AM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
कडोलीत आगीत गवतगंजी खाक
Advertisement

कडोली : अज्ञातांनी लावलेल्या आगीत सुमारे 15 हजार रुपये किमंतीची गवत गंजी जळून खाक झाल्याची घटना कडोली येथे मंगळवार दुपारी घडली. येथील पेठ गल्लीतील रहिवासी मारुती संतराम कुट्रे यांच्या परसातील गवत गंजीला दुपारच्या वेळी कोणी नसल्याचे पाहून अज्ञातांनी आग लावल्याची शक्यता असून गवत गंजीने जोरदार पेट घेतला. शेजारच्या नागरिकांनी पाणी ओतून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. परिणामी या आगीत सुमारे 15 हजार रुपये किंमतीची गवत गंजी जळून खाक झाली. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.