कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंडोनेशियात हाहाकार

06:54 AM Dec 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भूस्खलनात रुग्णालये, शाळा, पूल उद्ध्वस्त; आतापर्यंत 1,000 हून अधिक मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था/ सुमात्रा

Advertisement

इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील तीन प्रांतांमध्ये भीषण पूर आणि भूस्खलनाने हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीत 1,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तसेच 218 जण बेपत्ता असून त्यांच्याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने शनिवारी यासंबंधी अधिकृत माहिती जाहीर केली.

इंडोनेशियात पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत आणि अनेक भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. या आपत्तीत जवळजवळ 1,200 सार्वजनिक सुविधांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 219 आरोग्य सुविधा, 581 शैक्षणिक संस्था, 434 प्रार्थनास्थळे, 290 कार्यालयीन इमारती आणि 145 पूल यांचा समावेश आहे. या संरचनांना झालेल्या नुकसानीमुळे मदत आणि बचाव कार्यातही गंभीर अडथळा येत आहे.

बाधित भागात उपजिल्हा पातळीवर डेटा पडताळणी केली जात असल्याचे बीएनपीबीच्या डेटा अँड इन्फॉर्मेशन सेंटरचे प्रमुख अब्दुल मुहारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नागरी नोंदींशी क्रॉस-रेफरन्सिंगद्वारे मृत आणि बेपत्ता लोकांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक जिह्यांमध्ये पडताळणी प्रक्रिया अजूनही सुरू असल्यामुळे अंतिम आकडेवारी बदलू शकते, असे सांगण्यात आले. दरम्यान, इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी आपत्तीग्रस्त आचे प्रांताला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. सरकार आपद्ग्रस्तांच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article