हिमाचलमध्ये अतिवृष्टीचा कहर
06:55 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पूरात अडकले अनेक लोक
Advertisement
नाहन: हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कटासन नजीक अचानक जलपातळी वाढल्याने चार गुज्जर परिवारांचे 25 लोक नदीदरम्यान अडकून पडले होते. याची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासनाच्या पथकांनी सुमारे 3 तासांपर्यंत चाललेल्या जोखिमयुक्त बचाव अभियानानंतर सर्व लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. बचाव अभियानाच्या प्रभावी समन्वयासाठी एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते. पोलीस अन् होमगार्डच्या जवानांनी तत्काळ बचाव अभियान सुरू केले होते. सुमारे 3 तासांपर्यंत चाललेल्या या अभियानादरम्यान जलपातळी कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागली आणि संधी मिळताच एक-एक करत सर्व लोकांना तेथून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. बचावण्यात आलेल्या लोकांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश होता.
Advertisement
Advertisement