तिमाहीत हॅवेल्सचा निव्वळ नफा 288 कोटींच्या घरात
कंपनीने मंगळवारी दिली शेअर बाजाराला माहिती
मुंबई :
ग्राहक इलेक्ट्रिकल उत्पादने निर्मितीमधील कंपनी हॅवेल्स इंडिया लिमिटेडने मंगळवारी सांगितले की डिसेंबरमध्ये संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत त्यांचा एकत्रित निव्वळ नफा 1.54 टक्क्यांनी किरकोळ वाढून 287.91 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या संदर्भातील माहिती शेअर बाजाराला कंपनीने दिली आहे.
एका वर्षापूर्वी ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीने 283.52 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला होता. दरम्यान, हॅवेल्स इंडियाच्या संचालक मंडळाने मंगळवारी झालेल्या बैठकीत अंतरिम लाभांश जाहीर केला.
हे 1 रुपये प्रति इक्विटी शेअर 3 रुपये आहे.
सदरच्या कालावधीत हॅवेल्सचा ऑपरेटिंग महसूल 6.93 टक्क्यांनी वाढून 4,413.86 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो 4,127.57 कोटी रुपये होता. ऑक्टोबर-डिसेंबर 2023 या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 7.74 टक्क्यांनी वाढून 4,079.02 कोटी रुपये झाला आहे. हॅवेल्सच्या मते, केबल आणि प्रकाश उपकरणे व्यवसायाला पायाभूत सुविधांच्या सतत मागणीमुळे वाढीला वाव मिळत आहे. याशिवाय, जाहिराती आणि विक्री प्रोत्साहन खर्चही गेल्या तिमाहीत सणासुदीच्या काळात जास्त राहिला.