महाडिक कुटुंबीयांच्या साक्षीने हत्तरगी गटाचा मंडलिक यांना पाठिंबा
गडहिंग्लज तालुक्यातून संजय मंडलिक यांना गेल्या वेळेपेक्षा उच्चांकी मताधिक्य देणार. अमेय सदानंद हत्तरगी यांची ग्वाही
कोल्हापूर प्रतिनिधी
‘महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना संसदेत दुस्रयांदा पाठवण्यासाठी महाडिक कुटुंबीयांच्या साक्षीने गडहिंग्लज तालुक्यातून गेल्या वेळी पेक्षा उच्चांकी मताधिक्य देण्याचा निर्धार हत्तरगी गटाच्या वतीने अमेय हत्तरगी यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर येथे राजाराम कारखान्यावर झालेल्या भेटीत उमेदवार संजय मंडलिक यांच्यासह माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, अमेय हत्तरगी, गडहिंग्लज तालुका शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष वरदशंकर वर्दापगोळ, गंगाधर व्हस्कोटी, माजी जिल्हा परिषद सदस्य मलगोंडा पाटील, वीरशैव बँकेचे माजी अध्यक्ष महादेव साखरे, संकेश्वर कारखान्याचे संचालक उदय देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य चंदू पाटील, श्री. नीळपणकर, सिद्धाप्पा कल्याणी ( हेब्बाळ), अशोक स्वामी, ?ड. सुरेश कुराडे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य भूषण पाटील बिद्रीचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अमेय हत्तरगी म्हणाले,ठ माजी आमदार महादेवराव महाडिक आणि कुटुंबीय यांच्या आदेशाने महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठिंबा व्यक्त करून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यात कार्यकर्त्यांची फळी उभी करणार. तालुक्यातून एक एक मत गोळा करून संजय मंडलिक यांना प्रचंड मताधिक्याने विजय करण्याचा निर्धार यावेळी हत्तरगी गटाकडून व्यक्त करण्यात आला. केंद्रात मोदी यांची हॅट्रिक साधण्यासाठी संजय मंडलिक यांना दुस्रयांदा संसदेत पाठवणे गरजेचे आहे. जिह्याचा विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्याकडून निधी खेचून आणण्यात लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक ही जोडगोळी ख्रया अर्थाने सक्षम आहे. कोरोनानंतर दोनच वर्षात त्यांनी आणलेला निधी पाहिला, तर येण्राया पाच वर्षात हजारो कोटीचा निधी केंद्र आणि राज्याकडून खेचून आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. म्हणूनच त्यांच्या मागे आपली सर्व शक्ती उभी करत आहोत. अशी ग्वाही यावेळी अमेय हत्तरगी यांनी दिली.