हातकणंगले पत्रकार भवनाचा प्रश्न एक वर्षात मार्गी लावणार : खासदार धैर्यशील माने
कुंभोज प्रतिनिधी
पत्रकार हा समाजव्यवस्थेचा आरसा असून आज पत्रकार ते मुळेच समाजव्यवस्था स्थिर असल्याचे चित्र दिसत आहे. पत्रकारांनी पत्रकारिता निरपेक्षपणे करून सत्य जनतेसमोर आणावे त्यासाठी शोध पत्रिका करता गरजेचे आहे, अशी गौरव उद्गार खासदार धैयशील माने यांनी काढले.
अतिग्रे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित महाराष्ट्र पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी हातकणंगले पत्रकार भावनांचा प्रश्न येथे एक वर्षात मिटवला जाईल,तसेच पत्रकारांच्या साठी वेगवेगळ्या योजना अमलात आणण्याची जबाबदारी खासदार म्हणून माझी असल्याचेही सांगितले, यावेळी दलित मित्र अशोक माने यांनी पत्रकारांच्यासाठी आरोग्य विमा आपण सुरू करणार असल्याची माहिती देऊन पत्रकार बनवण्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संरक्षण कायदा पत्रकार आरोग्य खूप पत्रकार भवन आदी विषयावरती पत्रकार विनोद शिंगे यांनी आपल्या प्रकट भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू), राजयोगिनी ब्राह्मकुमारी शिवणीदीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी माजी सरपंच व सोनाली उद्योग समूहाचे प्रमुख संदीप कारंडे, पत्रकार राजकुमार चौगुले,अभिनंदन खोत,माजी जि प सदस्य बबलू मकानदार,जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये,प्रेस क्लब चे अध्यक्ष धनंजय टारे,पत्रकार रोहन साजणे,विनोद शिंगे,मनोहर चौगुले विनय पाटील,पोपटराव वाक्से,सुकुमार अब्दागिरे,शिवाजी वागरे,आकाश शिंदे,सागर जमणे,नानासो जाधव,आशिष कोठावळे,राजु मुजावर,यांसह पत्रकार व त्यांचा परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.