हातकणंगलेत कारखानदार विरुद्ध शेतकरी अशीच लढत; राजू शेट्टी यांची विरोधकांवर जोरदार टिका
मला कोणत्याही आघाडीसोबत जायचं नाही असं मी मागेच जाहीर केलं होतं तरीही महविकास आघाडीसोबत आम्ही जाणार असल्याच्या बातम्या चालवल्या जात आहेत. शक्तिपीठ महामार्गात शेतकऱ्यांची जमीन जाणार असून शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केंद्र सरकारकडून केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच हातकणंगले मध्ये सत्यजित पाटील यांच्या उमेदवारीमुळे कारखानदार विरूद्ध शेतकरी अशीच लढत होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
पहा VIDEO >>> मला कोणत्याही आघाडीसोबत संबंध ठेवायचे नाहित- राजू शेट्टी
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या बदलत्या राजकिय पार्श्वभुमीवर राजू शेट्टी यांनी आज कोल्हापूरात पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमध्ये त्यांनी महा विकास आघाडी बरोबरच महायुतीवरही टिकास्त्र सोडले.
हे महाविकास आघाडीचं हे पाप...
यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी महायुतीवर निशाणा साधला. भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षाची आम्ही २०१४ लाच फारकत घेतली आहे. तर महविकास आघाडी सोबतसुद्धा आम्ही जाणार नाही हे सहा सात महिन्यापूर्वी सांगितल होत. तरीही आम्ही महाविकास आघाडी सोबत जाणार असल्याच्या बातम्या चालवल्या जात आहेत. आज भाजप जाती- धर्मात तेढ निर्माण भाजप करत असून जमिनी घेणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाद्वारे शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. या महामार्गात शेतकऱ्यांची जमीन जाणार असून हे महाविकास आघाडी सरकारचं हे पाप आहे.
उध्दव ठाकरे यांनी शब्द फिरवला...
शिवसेनेवर घणाघाती टिका करताना राजू शेट्टी यांनी तालुक्यातील शिवसैनिकांनी विनंती केल्याने मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याचं सांगितलं. मी त्यावेळीही महाविकासं आघाडीत येणार नसल्याचं सांगितल होतं. शिवसेनेने फक्त उमेदवार उभा न करता जागा रिकामी सोडावी अशी विनंतीही मी केली होती. उध्दव ठाकरे यांना होकारही दिला होता. मात्र अचानकच त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला. उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवला.