For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासदार हरवल्याची चर्चा विरोधकांकडून जाणिवपुर्वक; धैर्यशील माने यांचा विरोधकांवर आरोप

04:15 PM Mar 01, 2024 IST | Abhijeet Khandekar
खासदार हरवल्याची चर्चा विरोधकांकडून जाणिवपुर्वक  धैर्यशील माने यांचा विरोधकांवर आरोप
MP Darisheel Mane
Advertisement

खासदारांचा जनसंपर्क घटला असून हातकणंगले तालुक्यात कोणत्याही प्रकारची विकासकामे झाली नसल्याचा अपप्रचार विरोधकांकडून जाणिवपुर्वक होत आहे. त्यामुळे अशाप्रकारचा अप्रचार ही विरोधकांची स्टंटबाजी असल्याचा थेट आरोप खासदार धैर्यशील माने यांनी केला आहे. खासदार धैर्यशील माने यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना विरोधकांवर निशाणा साधला.

Advertisement

काही महीन्यापुर्वी हातकणंगले मतदारसंघात खासदार हरवल्याचे डिजीटल बॅनर लागले होते. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी खासदारांना याविषय़ी विचारले असता. त्यांनी हा विरोधकांचा अपप्रचार असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "हा विरोधकांचा कांगावा आहे. माने घराण्याची समाजाशी कायमची नाळ जुळली असून त्यामुळेच आम्ही आत्तापर्यंत बारा वेळा निवडणुका लढवून त्यापैकी दहा निवडणुकांमध्ये लढवून आठ वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळेच ही जनतेशी संपर्क असल्याची पोचपावती आहे. मी स्वत: तर जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, खासदार अशा पद्धतीने वर गेलो आहे. त्यामुळे विरोधकांच्या टिकेकडे लक्ष देण्याची गरज नाही." असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, "कोल्हापूर जिल्ह्यात खासदार म्हणून सर्वाधिक निधी मी आणला असून मतदारसंघात आत्तापर्यंत ८२०० कोटी रुपयांची कामे केली आहेत. माझ्या लोकसभा मतदारसंघात स्थानिक विकासाची कामाबरोबरच रत्नागिरी- हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग, शाहूवाडी, शिरोळ येथे एमआयडीसी अशी मोठी कामे केली असून अजूनही मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत." असे ते म्हणाले.

Advertisement

इचलकरंजी शहराला होणाऱ्या दूधगंगा पाणी योजनेला कागल मधून विरोध होत असल्याने या शहराला पर्यायी योजना देण्यात येईल असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्याची आछवण करूण देल्यावर ते म्हणाले, "सध्या इचलकरंजी शहराची लोकसंख्या वाढत असून त्यासाठीची आवश्यक आणि शास्त्रोक्त पाणी पाहणी केल्यानंतरच इचलकरंजीला पाणी योजना मंजूर झाली आहे. इचलकरंजीला पुढील ४० वर्षे पाणी देऊनसुद्धा दूधगंगा नदीमध्ये कायमचे पाणी राहणार आहे. मात्र या गोष्टीला जाणीवपूर्वक विरोध केला जात असून उद्या मुख्यमंत्र्यांकडे होणाऱ्या बैठकीत दूधगंगा पाणी योजना झालीच पाहिजे अशी आग्रही भुमिका मी मांडणार आहे." असे खासदार माने म्हणाले.

Advertisement
Tags :

.