For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वनडे मालिकेतून हसरंगा बाहेर

06:52 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
वनडे मालिकेतून हसरंगा बाहेर
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

Advertisement

सध्या येथे सुरु असलेल्या यजमान लंका आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील उर्वरित सामन्यांना लंकेच्या अष्टपैलू हसरंगाला दुखापतीमुळे मुकावे लागणार आहे.

या मालिकेतील उभय संघात खेळविण्यात आलेला पहिला सामना टाय झाला. यानंतर रविवारी या मालिकेतील दुसरा सामना खेळविला जात आहे. या दुसऱ्या सामन्यात खेळताना हसरंगाला स्नायू दुखापत झाली. ही दुखापत बरी होण्यास काही कालावधीची आवश्यकता असल्याने तो या मालिकेतील उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही. लंकन क्रिकेट मंडळाने हसरंगाच्या जागी जेफ्री व्हँडेरेसी याची बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. या मालिकेत पथिरना, मधूशंका, चमीरा आणि तुषारा हे प्रमुख गोलंदाज खेळत नसल्याने तसेच यामध्ये दुखापतग्रस्त हसरंगाची भर पडल्याने लंकेची गोलंदाजी भक्कम राहणार नाही. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना येथे 7 ऑगस्ट रोजी खेळविला जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.