हरमल येथे 21.98 लाखाचा चरस जप्त
परप्रांतीय संशयिताला अटक
प्रतिनिधी/ पणजी
गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी हरमल येथे केलेल्या कारवाईत 21 लाख 98 हजार ऊपये किमतीचा चरस जप्त केला. या प्रकरणात हिमाचल प्रदेश येथील एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. संशयिताच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. 2025 सालातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव युगल किशोर सिंग असे असून तो मूळ हिमाचल प्रदेश येथील असून हरमल येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. संशयित चरसच्या विक्रीसाठी गोव्यात आला असून हरमल येथे भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजन करून संशयित राहत असलेल्या खोलीवर छापा मारला आणि त्याला अटक केली. त्याच्याकडून 2 किलो 198 ग्रॅम चरस, 17 हजार 500 ऊपये रोख रक्कम तसेच एक मोबाईल जप्त करण्यात आला. संशयिताची कसून उलट तपासणी केली असता तो हिमाचल प्रदेश येथून चरस विकण्यासाठी गोव्यात आला होता, असे त्याने उघड केले आहे. ही कारवाई निरीक्षक लक्षी आमोणकर व त्यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुऊ आहे. या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.