For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात येणारा 2 कोटीचा चरस जप्त, तिघांना अटक

06:22 AM Dec 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात येणारा 2 कोटीचा चरस जप्त  तिघांना अटक
Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोव्यात येणारा 2 कोटी ऊपये किमतीचा 3 किलो 68 ग्रॅम मलान क्रिम (चरस) जप्त केला आहे. गोव्यातील दोघांसह तिघाजणांना अटक केली आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरात पार्ट्यांची धूम सुऊ झाली असून गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने गोव्यात अधिक पार्ट्या आयोजित करण्याचा प्रत्येकाचा कल असतो. या पार्ट्यांमध्ये युवक, युवतींना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थांचा वापर केला जातो. दिल्लीत जप्त करण्यात आलेला चरसही गोव्यात होणाऱ्या पार्ट्यांसाठी येत असल्याचे उघड झाले आहे.

Advertisement

नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात आयोजित केलेल्या पार्ट्यांमध्ये ड्रग्सचा नियोजित पुरवठा करण्यात येणार होता. गोपनीय माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी धडक कारवाई करीत गोव्यातील दोघांसह तिघांच्या मुसक्या आवळल्या.  चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौहान याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गोवा स्थित दोन पोर्तुगीज नागरिक अन्य पर्यटकांना ड्रग्सचा पुरवठा करणार होते.

चौहान हा स्वत: ड्रग्सच्या आहारी गेलेला असून तो हिमाचल येथून ड्रग्स घेऊन गोव्यात येत होता. दर किलोमागे त्याला 50 हजार ऊपये मोबदला दिला जायचा. गेल्या सप्टेंबरपासून तो हे काम करत होता अशी माहिती समोर आली आहे. या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी फर्नांडिस आणि फुर्तादो या पोर्तुगीज नागरिकांना अटक केली.

फर्नांडिस हा गोव्यातून हिमाचल येथे चरस घेण्यासाठी जात होता. तेथून या अमलीपदार्थांना तो गोवा तसेच अन्य दाक्षिणात्य राज्यात वाढीव दरात विकायचा. फुर्तादो हा या व्यवहारातील मुख्य व्यक्ती आहे. तोच ड्रग्सच्या पुरवठ्याचे काम पहायचा. दरम्यान या तिघांवर अमलीपदार्थ विरोधी कायद्यांतर्गत योग्य कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.