For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हसरंगाला पहिले तीन सामने हुकणार

06:22 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
हसरंगाला पहिले तीन सामने हुकणार
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

Advertisement

22 मार्चपासून सुरू होणाऱ्या 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील पहिले 3 सामने लंकेच्या अष्टपैलू हसरंगाला हुकणार आहेत. या स्पर्धेत हसरंगा सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे.

22 मार्चपासून बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार असून या मालिकेसाठी लंकन कसोटी संघात हसरंगाचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये हसरंगा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. पण लंकन क्रिकेट मंडळाने 26 वर्षीय हसरंगाची लंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड केली. आता लंकेच्या 17 जणांच्या संघामध्ये हसरंगा आणि नवोदित फिरकी गोलंदाज निशान पेरिसचा समावेश राहिल. लंका आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी 22 ते 26 मार्च दरम्यान सिलेत येथे तर दुसरी आणि शेवटची कसोटी चेतोग्राम येथे 30 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान होणार आहे. आयपीएल स्पर्धेसाठी सनरायझर्स हैदराबादने हसरंगाला 1.5 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते. आयपीएल स्पर्धा आयोजकांनी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमामुळे पहिल्या 2 आठवड्यांचे स्पर्धा वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केले आहे. सनरायझर्स हैदराबादचा या स्पर्धेतील पहिला सामना केकेआर संघा बरोबर 23 मार्चला होणार आसून त्यानंतर त्यांचा दुसरा सामना 27 मार्चला मुंबई इंडियन्स बरोबर खेळविला जाणार आहे. हैदराबाद संघाचा तिसरा सामना 31 मार्चला गुजरात टायटन्स बरोबर होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.