For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनिल देशमुखांनी इतकं खोटं बोलून नये....मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करणार

05:41 PM Dec 02, 2023 IST | Abhijeet Khandekar
अनिल देशमुखांनी इतकं खोटं बोलून नये    मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करणार
Hasan Mushrif Anil Deshmukh
Advertisement

कर्जत येथिल चिंतन शिबिरात अजित पवार यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत जो काही खुलासा केल्यानंतर अनिल देशमुख यांनी अजित पवारांचा हा दावा फेटाळला. त्यावर कोल्हापूरचे पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांनी जे काही सांगितले ते वस्तुस्थितीला धरून असून अनिल देशमुख यांनी आता इतकं खोटं बोलू नये, असा टोलाही हाणला आहे.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे चिंतन शिबिर कर्जत येथे पार पडले. या शिबिरात व्यासपीठावरून बोलताना अजित पवार गटातील नेत्यांनी शरद पवार गटावर टिका करून आरोप केले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या आगीत पुन्हा तेल ओतले गेले असून दोन्ही गटाकडून आता एकमेकांवर टिका केली जात आहे.

कालच्या शिबिरात अजित पवारांनी अनिल देशमुखांवर आरोप करून भाजपबरोबर जाण्यासाठी अनिल देशमुखांची संमती होती. असा खुलासा केला. त्यावर अनिल देशमुखांनी अजित पवारांचा दावा खोडून काढत यात कोणतेही तथ्य नसल्य़ाचा पलटवार केला.
आता या वादामध्ये राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ य़ांनी उडी घेतली असून अनिल देशमुख खोटे बोलत असल्याचे सांगितलं, ते म्हणाले "अजित पवारांनी जे सांगितलं ते वास्तुस्थियीला धरून आहे. आमच्या सोबत अनिल देशमुख ही होते नंतर त्यांनी नकार दिला, त्यांनी इतकं खोटं बोलू नये." असा टोला त्यांनी हाणला.

Advertisement

पुढे बोलताना त्यांनी लोकसभा निवडणूक उमेदवारीवर भाष्य करताना हसन मुश्रीफ म्हणाले, "जिथे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्या सर्व जागा आम्हीच लढवणार असून त्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचासुद्धा आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रामाणिकपणे प्रयत्न करेल."असेही ते म्हणाले

Advertisement
Tags :

.