For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सारा अर्जुनला मिळाला बायोपिक?

06:01 AM Apr 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
सारा अर्जुनला मिळाला बायोपिक
Advertisement

धुरंधरच्या यशानंतर अनेक ऑफर्स

Advertisement

सारा अर्जुन सध्या धुरंधर 2 चित्रपटाच्या यशाला अनुभवत आहे. अभिनेत्रीने चित्रपटात यलीना ही भूमिका साकारली होती. तर अभिनेत्रीला आता एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. सारा अर्जुन लवकरच एका चित्रपटात मधुबाला यांची व्यक्तिरेखा साकारणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जसमीत रीन करणार असून संजय लीला भन्साळी यार्चे निर्माते असणार आहेत.

चित्रपट सध्या निर्मितीपूर्व स्थितीत असू चालू वर्षाच्या अखेरपर्यंत याचे चित्रिकरण सुरू होऊ शकते. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाला जिवंत करत सर्वांसमोर आणणे आणि मधुबाल यांचे जीवन तसेच कारकीर्दीला एक भव्य सिनेमाई श्रद्धांजलीच्या स्वरुपात दर्शविणे या प्रोजेक्टचा उद्देश आहे.

Advertisement

मधुबाला यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सारा अर्जुनला फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनवर खूप काम करावे लागणार आहे. मधुबाला यांच्याबद्दलचे आकर्षण प्रामाणिक स्वरुपात चित्रित करण्यासाठी साराला मोठी मेहनत करावी लागणार आहे. कॉस्ट्यूम डिटेलिंगपासून डायलेक्ट ट्रेनिंगपर्यंत निर्माते त्या युगातील अचुकतेला पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

दिग्दर्शक जस्मी रीन यांना डार्लिंग्स यासारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. या इंटेंस ड्रामासाठी दिग्दर्शक मधुबाला यांचे यश आणि इमोशनल स्ट्रगल दोन्ही गोष्टींना पडद्यावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. चित्रपट निर्मात्यांनी प्रोजेक्टशी निगडित अनेक माहिती सध्या गुप्त ठेवली आहे.

Advertisement
Tags :

.