हरियाणा, उत्तरप्रदेश, दिल्ली विजयी
वृत्तसंस्था, बडोदा
येथे सुरू असलेल्या 72 व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय पुरूष कब•ाr चॅम्पियनशिप स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी हरियाणा, उत्तरप्रदेश, दिल्ली आणि तामिळनाडू यांनी प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय नोंदवित आपली विजय घोडदौड कायम राखली आहे.
2026 च्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय पुरूषांच्या कब•ाr स्पर्धेत आता विविध गटातील संघांमध्ये बाद फेरीसाठी अधिक कडवी चुरस पहावयास मिळेल. अ गटातील झालेल्या अटीतटीच्या सामन्यात आंध्रप्रदेशने तेलंगणावर 47-45 अशा केवळ दोन गुणांच्या फरकाने थरारक विजय मिळविला. या सामन्यात आंध्रप्रदेशच्या पी. गोपिचंदने 17 गुण तर रे•ाrने 10 गुण नोंदविले. तेलंगणातर्फे राजूने 20 गुण नोंदविले. त्यानंतर दिवसातील अ गटातील दुसऱ्या सामन्यात हरियाणाने तेलंगणाचा 49-18 अशा गुणांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात हरियाणातर्फे निरज नरवालने 11 गुण तर नितीनकुमारने 9 तसेच सुरजितसिंग आणि नितेशकुमार यांनी प्रत्येकी 4 टॅकलगुण मिळविले.
ब गटातील सामन्यात मध्यप्रदेशने गोवा संघाचा 35-34 अशा केवळ एका गुणाने निसटता पराभव केला. मध्यप्रदेश संघातर्फे भवानी रजपूतने 14 गुण तर उदय पराठेने 9 गुण नोंदविले. क गटातील सामन्यात तामिळनाडूने विदर्भचा 40-21 असा गुणांनी फडशा पाडला. तामिळनाडूतर्फे सतीश काननने 8 गुण तर दीपक एस.ने 8 टॅकल गुण मिळविले.
क गटातील अन्य एका सामन्यात हिमाचल प्रदेशने गुजरातचा 51-34 अशा 17 गुणांच्या फरकाने पराभव केला. हिमाचल प्रदेशतर्फे अनिलने 14 गुण तर पप्पू कमलकुमार आणि मयांक सैनी यांची अनिलला चांगली साथ लाभली. गुजराततर्फे मितेश प्रजापतीने 13 गुण नोंदविले.
ड गटातील सामन्यात उत्तरप्रदेशने मणिपूरचे आव्हान 70-33 असे 37 गुणांच्या फरकाने संपुष्टात आणले. उत्तरप्रदेश संघातर्फे उदय दबासने 25 तर सौरभवने 12 गुण घेतले. मणिपूरतर्फे मेनसनतर्फे 18 गुण नोंदविले. फ गटातील सामन्यात केरळने छत्तीसगडचा 45-30 असा पराभव केला. केरळतर्फे नंदुने 11 तर आदित्यनने 10 गुण नोंदविले. छत्तीसगडतर्फे एस. मिश्राने 10 गुण नोंदविले. च गटातील सामन्यात दिल्लीने त्रिपुरावर 64-42 अशा गुणांनी विजय मिळविला. या सामन्यात दिल्लीतर्फे आशिषने 18 तर हिमांशू सिंगने 14 गुण नोंदविले. त्रिपुरातर्फे दासने 25 गुणांची नोंद केली.