महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हरियाणा मतदानाची तारीख बदलणार नाही ?

07:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

1 ऑक्टोबर रोजीच मतदान : भाजपची मागणी नाकारल्याची चर्चा

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखेमध्ये कुठलाच बदल होणार नसल्याचे समजते. आता पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार 1 ऑक्टोबर रोजीच राज्यात मतदान होणार आहे. तर 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. परंतु आयोगाकडून अधिकृतपणे याप्रकरणी काहीच सांगण्यात आलेले नाही. दुसरीकडे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी पंकज अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.

इंडियन नॅशनल लोकदल आणि राज्यातील सत्तारुढ भाजपने निवडणुकीची तारीख बदलण्याची विनंती निवडणूक आयोगाला पत्राद्वारे केली होती. दोन्ही पक्षांनी सुटीचा दाखला देत मतदानाची तारीख बदलण्याची विनंती केली होती. इंडियन नॅशनल लोकदलाचे महासचिव अभय सिंह चौताला यांनी शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून 1 ऑक्टोबर रोजी होणारे मतदान पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मतदानाच्या दिवसानंतर दोन शासकीय सुट्या आहेत असे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.

सलग सुट्या असल्याने लोक फिरायला बाहेर पडतील, यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर प्रभाव पडणार असल्याचा दावा चौताला यांनी केला होता. तसेच निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासोबत निवडणुकीच्या तयारीवरही प्रतिकूल प्रभाव पडणार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. भाजपच्या मागणीला काँग्रेसने विरोध दर्शविला होता. हरियाणात भाजपचा जनाधार संपुष्टात आल्यानेच तो पक्ष निवडणूक टाळू पाहत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसने आयोगाला पत्र लिहून मतदानाची तारीख न बदलण्याची विनंती केली होती. हरियाणाच्या 90 विधानसभा मतदारसंघांमध्ये 5 सप्टेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article