For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरियाणा, ओडिशा विजयी

06:31 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
हरियाणा  ओडिशा विजयी
Advertisement

वृत्तसंस्था/ पुणे

Advertisement

हॉकी इंडियाच्या येथे सुरू असलेल्या वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत हरियाणा, ओडिशा आणि मिझोराम यांनी शानदार विजय मिळविले. या विजयामुळे हरियाणा आणि ओडिशा यांनी या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

रविवारी ड गटातील झालेल्या सामन्यात हरियाणाने पुडुचेरीचा 22 गोलानी दणदणीत पराभव केला. हरियाणाचा या गटातील हा सलग दुसरा विजय आहे. इ गटातील सामन्यात ओडिशाने चंदीगडचा 6-1 असा पराभव केला. फ गटातील लढतीत मिझोरामने राजस्थानवर 20-2 अशी मात केली. तामिळनाडूने गुजरातचा 6-0 असा पराभव केला. उत्तराखंडने दादरा-नागरहवेलीचा ग गटातील सामन्यात पराभव केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.