For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरियाणा, महाराष्ट्र विजयी

06:02 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
हरियाणा  महाराष्ट्र विजयी
Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

Advertisement

येथे सुरु असलेल्या हॉकी इंडियाच्या महिलांच्या राष्ट्रीय हॉकी लीग 2024-25 च्या पहिल्या टप्प्यातील शुक्रवारी झालेल्या सामन्यात हरियाणा आणि महाराष्ट्र यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय नोंदविलेत.

शुक्रवारच्या पहिल्या सामन्यात हरियाणाने मिझोरामचा 2-1 असा पराभव केला. हरियाणाचा या स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात हरियाणाची कर्णधार निलमने 28 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यानंतर 39 व्या मिनिटाला वनलारिनूलीने मैदानी गोल करुन मिझोरामला बरोबरी साधून दिली. 43 व्या मिनिटाला पिंकीने दुसरा आणि निर्णायक गोल करुन मिझोरामचे आव्हान संपुष्टात आणले.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्रने बंगालचा 2-1 असा पराभव केला. सामन्यातील पहिला गोल महाराष्ट्राच्या ऐश्वर्या दुबेने 29 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला. 33 व्या मिनिटाला जमुना एक्काने पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन बंगालला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. 54 व्या मिनिटाला तनुश्री काडूने मैदानी गोल करुन महाराष्ट्राला हा सामना 2-1 असा जिंकून दिला.

Advertisement
Tags :

.