हरियाणा, केरळ उपांत्यपूर्व फेरीत
06:09 AM Feb 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ बेंगळूर
Advertisement
2025 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेत इलाईट क गटातून हरियाणा आणि केरळ यांनी उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. केरळने क गटातील सामन्यात केवळ 2 दिवसांतच बिहारचा एक डाव आणि 169 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात केरळला बोनस गुणासह 7 गुण मिळाल्याने त्यांची गुणसंख्या 28 झाली आहे.
बेंगळूरमधील कर्नाटक आणि हरियाणा यांच्यातील सामन्यात कर्नाटकाचा पहिला डाव 304 धावांवर आटोपल्यानंतर हरियाणाने पहिल्या डावात 5 बाद 232 धावा जमविल्या. अंकितकुमारने शानदार शतक (118) धावा जमविल्या. हरियाणाने या सामन्यात संभाव्य फॉलोऑन टाळला असून या संघाने रणजी स्पर्धेत 2016-17 नंतर पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र कर्नाटकाला यावेळी पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीपासून वंचित होण्याची शक्यता आहे.
Advertisement
Advertisement