रताळी-बटाटे पिकात पावसाचे पाणी शिरल्याने काढणी खोळंबली
भुईमूग शेंगाला कोंब येण्याची शक्यता : शेतकऱ्यांना आर्थिक फटका : पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली
वार्ताहर/उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागातील उचगाव, बेकिनकेरे, कुद्रेमनी, बेनकनहळ्ळी, सावगाव, सुळगा, सोनोली, राकसकोप, गोजगे, मण्णूर, मंडोळी परिसरामध्ये खरीप हंगामामध्ये लागवड केलेल्या व सध्या हातातोंडाशी आलेल्या बटाटा, रताळी, भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. हा भाग खरीप हंगामातील पिकांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र सध्याच्या अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा धोका निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत. हा पाऊस सध्या या पिकांना मारक ठरत असल्याची चर्चा असून शेतकरी सध्या या पावसामुळे चिंताग्रस्त बनला आहे.
चालूवषीचा हंगाम पाहता माळजमिनीतील बटाटे पिकाला प्रमाणातच पावसाची-पाण्याची गरज असते. मात्र यावषी पावसाने अधिकच जोर धरल्याने बटाटा पीक म्हणावे तसे फुलले नाही. परिणामी बटाटे पीक उत्पादनात यावषी घट होत असल्याची चर्चा शेतकऱ्यांतून आहे. या संपूर्ण परिसरात बटाटा पीक मोठ्या प्रमाणात घेतला जातो. यावषी बियाणांची लागवडही मोठ्याप्रमाणात केलेली होती. मात्र जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी वर्गाला या पिकाने दगा दिल्याचे बोलले जात आहे.
लाल मातीतील बटाटा चवदार
बेळगावचा पश्चिम भागातील उचगाव, बेळगुंदी,बेकिनकेरे या संपूर्ण भागात लाल जमिनीतील बटाट्याचे उत्पादन अधिक प्रमाणात काढले जाते. हा बटाटा अतिशय चवदार असून या बटाट्याला पसंती अधिक दिली जाते. यामुळे मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्यांकडून या बटाट्याला मागणी अधिक असल्याचेही दिसून येते.
भुईमूग पिकाला कोंब येण्याची शक्मयता
या संपूर्ण भागात भुईमूग पिकाचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन काढले जाते. काळूबाळू आणि जवारी अशा दोन जातीच्या बियाणांची पेरणी या भागात केली जाते. सदर पीक जोमात आले असून काढणीला प्रारंभ होत असतानाच रिमझिम पावसामुळे या शेंगांना कोंब येण्याची दाट शक्मयता निर्माण झाली आहे. शेंगांच्या काढणीला प्रारंभ केले आहे. मात्र ऐनवेळी पावसाने सुऊवात केल्याने या पिकालाही धोका निर्माण झाला आहे. असाच पाऊस आणखी काही दिवस चालू राहिला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
‘पूर्व पूर्वलागवड रताळी काढणीला प्रारंभ
या भागात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात रताळी लागवड केली जाते. बिनखर्चाचे आणि कमी श्र्रमात येणारे पीक म्हणून रताळी पिकाकडे पाहिले जाते. अधिक उत्पादनासाठी पोषक हवामान आणि वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात हे पीक काढले जाते. अगोप लागवडीमुळे काही भागात रताळ्याची काढणीही सुरू आहे. परंतू पाऊस होत असल्याने काढणी हंगाम थंडावली असून काढलेली रताळी पाण्याने धुवून स्वच्छ करून मग ती मार्केट यार्डमध्ये विक्रीला नेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
खरीप हंगाम निसर्गावरच अवलंबून
गतवषी पाऊस कमी झाल्याने पिकांना धोका झाला. तर चालूवषी अधिक पाऊस तसेच सध्या बटाटा, भुईमूग या पिकांची काढणी करत असतानाच सुरू झालेल्या या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकरी वर्गाला खरीप हंगामासाठी पूर्णत: निसर्गावरच अवलंबून राहावे लागते. त्याने जर चांगली साथ दिली तरच पीक जोमात येते. आणि शेतकऱ्यांच्या हाती चार पैसे मिळतात. मात्र यावषीही पुन्हा या पावसाने ऐन काढणीच्या हंगामातच धोका देण्यास सुऊवात केल्याने खरीप हंगामातील पिके हाताला लागतील की नाही याची शंका आता वाटू लागली आहे.
- बाबाजी उर्फ बबलू चौगुले, उचगाव
चिखलामुळे रताळी धुवून विक्रीसाठी बाजारात
बेकिनकेरे या भागातील माळजमिनीमध्ये दरवषी खरीप हंगामात रताळ्यांच्या वेलीची अगोप लागवड केली जात असल्याने सप्टेंबर अखेर ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या पिकाच्या काढणीला जोर आलेला असतो. यावषी रताळी पीक जोमात असून सध्या काढणीही जोरात आहे. मात्र या काढणीच्या हंगामातच पावसामुळे काढणी खोळंबली असून काढलेली रताळी चिखलामध्ये घाण झाल्याने ती आता धुऊनच बाजारात नेण्याची वेळ आली आहे. यामुळे या काढणीचा आणि स्वच्छ करण्याचा खर्च हा विनाकारण शेतकऱ्याला भुर्दंड बसत आहे.
- गजानन मोरे, बेकिनकेरे