‘सिला’मध्ये हर्षवर्धन राणे
सनम तेरी कसम चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकणारा हर्षवर्धन राणे आता एका आकर्षक चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर सादर करण्यात आले आहे. हर्षवर्धनने हे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात सादिया खतीब ही अभिनेत्री मुख्य भूमिका साकारत आहे. पोस्टरवर हर्षवर्धनसोबत सादिया दिसून येत असून दोघेही जखमी अवस्थेत असल्याचे दिसून येते. हर्षवर्धनच्या या आगामी चित्रपटाचे नाव सिला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार करत आहे. चित्रपटात करणवीर मेहरा हा खलनायकाच्या भूमिकेत आहे. हर्षवर्धन याचबरोबर ‘एक दीवाने की दीवानियत’ या चित्रपटात दिसून येणार आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप जावेरीने केली आहे. चित्रपटात हर्षवर्धनसोबत पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा मुख्य भूमिकेत आहे.