For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संजीदा शेखसोबत रिलेशनशिपमध्ये हर्षवर्धन

06:39 AM Aug 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
संजीदा शेखसोबत रिलेशनशिपमध्ये हर्षवर्धन
Advertisement

मागील काही दिवसांपासून हर्षवर्धन राणे आणि संजीदा शेख हे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरु आहे. यापूर्वीही या दोघांना एकत्र पाहिले गेले आहे. आता त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टनंतर पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे ठाकू लागले आहेत.

Advertisement

हर्षवर्धन आणि संजीदाने स्वत:च्या इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी काही छायाचित्रे शेअर केली आहेत. ही छायाचित्रे पुण्यातील विंड्स ओवर वॉटरच्या केबिनची आहेत. दोन्हींच्या पोस्टमध्ये काही समानता दिसून येत आहे. पोस्ट एकाच ठिकाणची असून तेथे ते शांततायुक्त वेळ घालवताना दिसून येतात. खास बाब म्हणजेच दोघांची छायाचित्रे एकाच ठिकाणाची आहेत. हर्षवर्धन आणि संजीदाने दोन प्रोजेक्ट्सकरता एकत्र काम केले आहे. 2020 चा अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘तैश’ आणि थ्रिलरपट ‘कुन फाया कुन’मध्ये दोघांची जोडी दिसून आली होती. संजीदा शेख अलिकडेच आमिर अलीपासून विभक्त झाली असून तिला या विवाहापासून एक मुलगी आहे. तर हर्षवर्धन यापूर्वी किम शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.