For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हर्षिता जाखर टूर डी फ्रान्स फेम्समध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला

06:07 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
हर्षिता जाखर टूर डी फ्रान्स फेम्समध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला
Advertisement

वृत्तसंस्था

Advertisement

नवी दिल्ली

तरुण सायकलपटू हर्षिता जाखरने येथे ‘टूर डी फ्रान्स फेम्स‘मध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला ठरून इतिहासात आपले नाव कोरले. या 19 वर्षीय खेळाडूने रविवारी या खडतर शर्यतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या औपचारिक प्रारंभावेळी अफगाणिस्तान, अल्जेरिया, चिली, इथिओपिया (दोन रायडर्स), नामिबिया आणि युगांडा येथील आठ प्रतिभावान सायकलपटूंच्या गटाचे नेतृत्व केले. ही स्पर्धा 1 ऑगस्ट रोजी लॉझान येथे सुरू झाली असून 9 ऑगस्ट रोजी नीस येथे संपेल. यूसीआय (युनियन सायक्लिस्ट डी इंटरनॅशनल) ने खास निवडलेल्या या संघाने डब्ल्यूसीसी रोड टीमच्या काही रायडर्ससोबत शर्यतीच्या मार्गाच्या एका तटस्थ भागावर 4.5 किलोमीटर सायकल चालवली, असे यूसीआयच्या एका निवेदनात म्हटले आहे. ‘टूर डी फ्रान्स फेम्स‘ ही महिलांची बहु-टप्प्यांची सायकल शर्यत आहे, जी पुरुषांच्या ‘टूर डी फ्रान्स‘च्या समकक्ष आहे. ही यूसीआय महिला वर्ल्ड टूर कॅलेंडरचा एक भाग आहे.

Advertisement

यूसीआय अध्यक्षांनी भारतीय प्रतिभेची प्रशंसा

स्टेज सुरू होण्यापूर्वी, यूसीआयचे अध्यक्ष डेव्हिड लॅपार्टिएंट हे रायडर्ससोबत स्टार्ट पोडियमवर सामील झाले आणि या स्पर्धेत एका भारतीयाला पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. भारताची अत्यंत प्रतिभावान हर्षिता जाखर आमच्या प्रतिष्ठित ‘यूसीआय वर्ल्ड सायकलिंग टॅलेंट‘ कार्यक्रमात सहभागी झाल्याचा आम्हाला आनंद आहे. मला खात्री आहे की तिला ‘टूर डी फ्रान्स फेम्स‘चा भाग व्हायला आवडेल आणि ती लवकरच प्रत्यक्ष स्पर्धेत भाग घेण्यासाठी परत येईल, असे ते म्हणाले. व्यावसायिक पेलोटॉनच्या पुढे सुरुवात करणाऱ्या या रायडर्सची निवड अशा विविध राष्ट्रीय फेडरेशन्समधून केली जाते, ज्यांच्याकडे स्वतचा उच्च-कार्यक्षमतेचा मार्ग नाही आणि ज्यांना युरोपियन प्रशिक्षण, सराव सुविधा आणि रेसिंगची संधी उपलब्ध नसते.

हर्षिता जाखरची सायकलिंगची स्वप्ने आणि आकांक्षा

लहानपणी माझ्या वडिलांमुळे मला सायकलिंगची आवड निर्माण झाल्यापासून, मी टूर डी फ्रान्सचे स्वप्न पाहिले आहे. इतर प्रतिभावान खेळाडूंसोबत सायकल चालवण्याची ही संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे.महिलांच्या शर्यतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला असलेल्या सायकलस्वार, हर्षिता म्हणाली.राजस्थानची रहिवासी असलेली हर्षिता भारतीय सायकलिंग क्षेत्रात आपली छाप पाडत आहे. तिने ज्युनियर गटातील जवळपास सर्व पदके जिंकली असून, सिनियर गटातही ती नियमितपणे विजय मिळवत आहे. 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अव्वल 10 मध्ये स्थान मिळवणे आणि 2030 च्या स्पर्धेत पदक जिंकणे हे तिचे ध्येय आहे. ‘टार्गेट एशियन गेम्स ग्रुप‘ची खेळाडू म्हणून, ती पटियाला येथील साई नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये तिचे वडील-प्रशिक्षक राकेश जाखर यांच्यासोबत प्रशिक्षण घेते. राकेश जाखर हे स्वत एक माजी सायकलपटू असून त्यांनी 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता आणि ते एनआयएस पटियालाचे पात्र प्रशिक्षक आहेत.

Advertisement
Tags :

.