For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

वडिलांचे अपूर्ण स्वप्न लेकीने केले पूर्ण; पदवीधरच्या पहिल्या महिला आमदार, हर्षदा जाधव-देशमुख यांच्या यशाची होतेय चर्चा

08:40 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
वडिलांचे अपूर्ण स्वप्न लेकीने केले पूर्ण  पदवीधरच्या पहिल्या महिला आमदार  हर्षदा जाधव देशमुख यांच्या यशाची होतेय चर्चा
Advertisement

कोल्हापूर : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या ३ हजार मतांनी पराभूत झालेल्या प्रभाकर देशमुख यांचे अपूर्ण स्वप्न त्यांच्या लेकीने पदवीधरच्या निवडणुकीत पूर्ण केले. राजकारणात वडिलांना अपयश आले, मात्र त्यांच्या मुलीने त्यांचे स्वप्न साकार केले. निवृत्त माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची कन्या हर्षदा जाधव-देशमुख. अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा जाधव-देशमुख विजयी झाल्या. त्यांच्या रुपाने पहिल्यांदाच पुणे पदवीधरचे प्रतिनिधीत्व एखादी महिला सदस्य करणार आहे.

Advertisement

माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हे निवृत्त झाल्यानंतर राजकारणात सक्रीय झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणुन रिंगणात उतरले होते. यावेळी त्यांची लढत ही भाजपाचे जयकुमार गोरे यांच्या सोबत झाली होती. यावेळी गोरे यांनी ९१,४६९ मते मिळवली होती, तर देशमुख यांनी दुसऱ्या क्रमांकाची तब्बल ८८ हजार ४२६ इतकी मते मिळवली होती. अवघ्या ३०४६ मतांनी त्यांचा पराभव झाला होता. राजकाराणातील त्यांचे स्वप्न यानिमित्ताने अपूर्ण राहिले होते. देशमुख यांनी राज्याचं विधिमंडळ गाठण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र निवडणुकीच्या राजकारणात त्यांना अपयश आले होते. त्यांच्या लेकीने हे स्वप्न आता साकार केले आहे.

सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेचे प्रणेते असलेल्या देशमुख यांनी पराभवानंतर तालुक्यात संपर्क कायम ठेवला होता. त्यांची कन्या हर्षदा जाधव-देशमुख यांना पुणे पदवीधर मतदार संघाची उमेदवारी मिळाली होती. महाविकास आघाडीने जाधव-देशमुख यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती. लोधवडे (ता. माण) हे देशमुख यांचे माहेर असून पुणे सासर आहे. त्यामुळे सातारा आणि पुणेसह पश्चिम महाराष्टाची त्यांना या निवडणुकीत चांगली साथ मिळाली. पहिल्याच निवडणुकीत दणक्यात मिळवलेल्या त्यांच्या या विजयाचे कौतुक होत आहे. तसेच हर्षदा देशमुख या पदवीधर मतदारसंघातील आतापर्यंतच्या सर्वात तरुण आमदार असल्याचाही दावा केला जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.