महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दंगे’ चित्रपटात हर्षवर्धन

06:06 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जॉन अब्राहमने ट्रेलर केला सादर

Advertisement

शैतान आणि वजीर यासारखे अनेक चित्रपटांचे दिग्दर्शक बिजॉय नांबियार नवा चित्रपट घेऊन येत आहेत, या चित्रपटाचे नाव दंगे आहे. या चित्रपटात हर्षवर्धन राणे आणि एहान भट्ट हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटाचा ट्रेलर सुपरस्टार जॉन अब्राहमने शेअर केला आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन राणेने या चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर शेअर केला होता. हे पोस्टर समोर आल्यावर चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. या चित्रपटात हर्षवर्धन हा अॅक्शन अवतारात दिसून येणार आहे. हा चित्रपट कॉलेजच्या दोन गटांमधील तणावाची कहाणी दर्शविणारा आहे.

कॉलेज फेस्टिव्हलदरम्यान हर्षवर्धन राणे आणि एहान हे साकारत असलेल्या व्यक्तिरेखा आमने-सामने येतात आणि येथूनच संघर्ष सुरू होत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. या ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. या चित्रपटात निकिता दत्ता ही अभिनेत्री देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहे. दंगे हा चित्रपट 1 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article