‘हॅरी पॉटर’ सीरिजच्या कलाकारांची घोषणा
हॅरी पॉटरच्या जादुई जगतावरून चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता राहिली आहे. हॅरी पॉटरच्या टीव्ही सीरिजमध्ये कुठला कलाकार कोणती भूमिका साकारणार हे आता निर्मात्यांकडून उघड करण्यात आले आहे.
हॅरी पॉटरच्या सीरिजमध्ये अल्बस डंबलडोरच्या भूमिकेत जॉन लिथगो दिसून येणार आहे. तर मिनर्वा मॅकगोनागल या भूमिकेत जेनेट मॅकटीर तर सेलेरस स्नेपच्या भूमिकेत पापा एस्सीडू दिसून येणार आहेत. रुबस हॅग्रिडचा खास रोल निक प्रॉस्ट साकारणार आहे. या सर्वांसोबत ल्यूक थॅलोन क्विरिनस क्विरेलच्या भूमिकेत दिसून येईल.
या सीरिजच्या कास्टची पहिली यादी जारी करण्यात आली आहे. अलिकडेच एचबीओने हॅरी पॉटर, हरमॉइनी आणि रॉन या व्यक्तिरेखांसाठी ओपन कास्टिंग कॉल सुरू केला होता. ज्यात 30 हजाराहून अधिक जणांनी प्रतिसाद दर्शविला. या सीरिजचे चित्रिकरण पुढील काही महिन्यांमध्ये सुरू होणार आहे. याचे दिग्दर्शन मार्क मायलॉड करणार असून लेखन प्रांसेस्का गार्डिनर करणार आहेत.