इंग्लंडची धुरा हॅरी ब्रूककडे
न्यूझीलंडविरुद्ध टी 20 मालिकेसाठी संघ जाहीर : युवा टॉम बँटनला संधी : शनिवारपासून मालिकेला सुरुवात
वृत्तसंस्था/लंडन
न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेइंग 11 घोषित केली आहे. हॅरी ब्रूककडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असून युवा टॉम बँटनलाही संधी देण्यात आल्याची माहिती ईसीबीने दिली आहे. उभय संघातील मालिकेला 18 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. फिल सॉल्ट आणि जोस बटलर सलामीवीर म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही यष्टीरक्षक-फलंदाज त्यांच्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत आणि संघाला त्यांच्याकडून जलद सुरुवातीची अपेक्षा असेल. युवा फलंदाज जेकब बेथेलला मधल्या फळीत स्थान देण्यात आले आहे. याशिवाय, आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी इंग्लिश संघात अनुभवी खेळाडूंसह काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. टॉम बँटन या युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे. सॅम करन आणि जॉर्डन कॉक्ससह या दोघांचीही संघात वर्णी लागली असून ब्रायडन कार्स आणि ल्यूक वूड हे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. लियाम डॉसन आणि आदिल रशीद हे दोघे फिरकी गोलंदाजी सांभाळतील.
न्यूझीलंडविरुद्ध टी 20 मालिकेसाठी इंग्लंडचा संघ : फिल सॉल्ट, बटलर, हॅरी ब्रूक (कर्णधार), बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, जॉर्डन कॉक्स, ब्रायडन कार्से, डॉसन, आदिल रशीद आणि ल्यूक वूड.