For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हॅरी ब्रूक इंग्लंडचा नवा कॅप्टन

06:18 AM Apr 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
हॅरी ब्रूक इंग्लंडचा नवा कॅप्टन
Advertisement

इंग्लिश बोर्डाकडून वनडे व टी 20 संघासाठी कर्णधाराची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था / इंग्लंड

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने वनडे आणि टी 20 संघासाठी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. युवा फलंदाज हॅरी ब्रूकची टी 20 आणि वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील खराब प्रदर्शनानंतर जोस बटलरने काही दिवसांपूर्वीच कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ब्रुकच्या नियुक्तीची माहिती सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

Advertisement

नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेदरम्यान जोस बटलरने इंग्लंडच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. इंग्लंडला बटलरच्या नेतृत्वात या स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तसेच संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारत बटलरने 28 फेब्रुवारीला कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून इंग्लंडच्या कर्णधारपदी कुणाची नियुक्ती होणार? याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहिले होते. सोमवारी अखेर ही प्रतिक्षा संपली आणि इंग्लिश बोर्डाने हॅरी ब्रूक हा इंग्लंडचा नवा व्हाईट बॉल कॅप्टन असणार असल्याचे घोषित केले.

गतवैभव प्राप्त करुन देण्याचे आव्हान

इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफीत निराशाजनक कामगिरी केली होती. साखळी फेरीत इंग्लंडला ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेने पराभूत केले होते. या स्पर्धेत लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे आता हॅरी ब्रूकसमोर इंग्लंडला आपल्या नेतृत्वात गतवैभव प्राप्त करुन देण्याचे आव्हान असणार आहे.

24 कसोटी, 26 वनडे व 44 टी 20 सामन्यांचा अनुभव

अर्थात, ब्रूक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारच नवखा नाही. हॅरीने इंग्लंडचे 24 कसोटी, 26 एकदिवसीय आणि 44 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. टेस्ट, वनडे आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 2281, 816 आणि 798 अशा धावा केल्या आहेत. तसेच हॅरीने आयपीएलमध्ये 11 सामने खेळले आहेत. हॅरीने आयपीएलच्या 18 व्या मोसमाआधी ऐनवेळेस स्पर्धेतून माघार घेतली. हॅरीची ही माघार घेण्याची सलग दुसरी वेळ ठरली. त्यामुळे बीसीसीआयने हॅरी याच्यावर बंदी घातली आहे.

Advertisement
Tags :

.