For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हॅरी ब्रूककडेच इंग्लंड वनडे संघाचे नेतृत्व

06:41 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
हॅरी ब्रूककडेच इंग्लंड वनडे संघाचे नेतृत्व
Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

इंग्लंडचा मर्यादित षटकांच्या सामन्यांचा कर्णधार जोस बटलर पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत खेळणार नसल्याचे ईसीबीने रविवारी सांगितले.

या घोषणेमुळे इंग्लंडच्या या मालिकेच्या तयारीवर सावट पडले आहे. 34 वर्षीय बटलर पोटरीच्या दुखापतीने त्रस्त आहे. या दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतही खेळता आले नाही. टी-20 मालिकेत सध्या इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात 1-1 अशी बरोबरी झाली असल्याने तिसऱ्या सामन्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. बटलरच्या गैरहजेरीत हॅरी ब्रूक इंग्लंड संघाचे नेतृत्व करीत असून वनडे मालिकेसाठीही त्याच्याकडेच ही जबाबदारी राहणार आहे.

Advertisement

युवा वेगवान गोलंदाज जोश हल यालाही दुखापतीमुळे वनडे मालिकेसाठी अनफिट ठरविण्यात आले असल्याने इंग्लंडच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. या 20 वर्षीय गोलंदाजाच्या गैरहजेरीत इंग्लंडचा वेगवान मारा आणखी कमकुवत बनला असल्याने संघव्यवस्थापनासमोर आव्हान उभे राहिले आहे. ईसीबीने अनुभवी अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोनला वनडे संघात सामील केले असून त्याच्यामुळे फलंदाजीत खोली व स्पिन गोलंदाजीत उपयुक्त पर्याय मिळाला आहे.

इंग्लंडचा वनडे संघ : हॅरी ब्रूक (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशिद, फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, ओली स्टोन, रीस टॉपले, जॉन टर्नर.

Advertisement
Tags :

.