For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Konkan News : बिजली मासळीची आवक वाढल्याने दर घसरले, छोटे मच्छीमार अडचणीत

01:54 PM May 19, 2025 IST | Snehal Patil
konkan news   बिजली मासळीची आवक वाढल्याने दर घसरले  छोटे मच्छीमार अडचणीत
Advertisement

सध्या सर्वत्र बिलजी मासळी मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

Advertisement

दापोली : तालुक्यातील हर्णै बंदरात सध्या बिजली मासळीची आवक वाढली आहे. परंतु छोट्या आकारामुळे बिलजी मासळीचा दर किलोला 25 रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे छोटे मच्छीमार पुन्हा अडचणीत सापडले आहेत. सध्या सर्वत्र बिलजी मासळी मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

हर्णे बंदरात ही बिलजीची आवक वाढलेली दिसत आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी किलोला 100 रुपये मिळणारा दर सध्या 25 रुपयांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे मासळी जास्त मिळूनही धंदा तोट्यात अशा प्रकाराने येथील मच्छीमार पुन्हा चिंतीत आहे. बिलजी मासळीसाठी पुणे व गोवा ही मुख्य मार्केट असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, हर्णैत मासळी साठवणुकीसाठी अद्ययावत सुविधा नसल्यामुळे मिळेल त्या दरात मासळी विकावी लागत आहे.

Advertisement

मासेमारीसाठी अवघे काही दिवस बाकी

मासेमारीसाठी 31 मे पर्यंतचा कालावधी आहे. त्यामुळे मासेमारीला काही अवघेच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे पुरेशी मासळी सापडत नसल्याची चिंता आहेच. शिवाय एलईडी, पर्ससीनेट या नौकाधारकांमुळे पारंपरिक मच्छीमार संकटात सापडला आहे.

पाहिले तर हंगाम सुरू झाल्यापासून मासेमारीत काही ना काही अडचणी निर्माण झाल्याचे समोर आले. त्यामुळे मासेमारीला अवघे काही दिवस बाकी असताना मिळणाऱ्या बिलजी मासळीला दर मिळत नसल्याचे मच्छीमार बांधवांमधून चिंता व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.