For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेच्या टी-20 संघात हरमितसिंग, मिलिंद कुमार

06:37 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेच्या टी 20 संघात हरमितसिंग  मिलिंद कुमार
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

टेक्सास होस्टन येथे 7 ते 13 एप्रिल दरम्यान होणाऱ्या कॅनडा विरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी अमेरिकेचा 15 जणांचा टी-20 संघ जाहीर करण्यात आला. या संघामध्ये मुंबईचा माजी तसेच राजस्थान रॉयल्सचा डावखुरा फिरकी गोलंदाज हरमितसिंग तसेच दिल्लीचा माजी क्रिकेटपटू व आरसीबीचा फलंदाज मिलिंद कुमार यांचा समावेश करण्यात आला आहे.

भारताच्या या दोन क्रिकेटपटूंना अमेरिकेच्या टी-20 संघात संधी मिळाल्याने न्यूयॉर्कमध्ये 12 जूनपासून सुरू होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी अमेरिकेच्या संघामध्ये स्थान मिळण्याची शक्यात वर्तविली जात आहे. सदर स्पर्धा अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने होणार आहे. 2012 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणाऱ्या भारतीय युवा संघामध्ये हरमितसिंगकडे भारतीय संघाचे नेतृत्त्व सोपविण्यात आले होते. हरमितसिंगने आतापर्यंत टी-20 सामन्यात 87 बळी मिळविले असून त्याने फलंदाजीत 733 धावा जमविल्या आहेत. हरमितसिंगने अमेरिकेतील व्यवसायिक क्रिकेट क्षेत्रात प्रवेश करण्याचे ठरविल्याने त्याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. हरमितसिंगने तीन वर्षांसाठी मेजर लीग क्रिकेट स्पर्धेकरिता सिटेली संघाकडून खेळण्याचे ठरविले आहे

Advertisement

Advertisement
Tags :

.