For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधूवर हवामान बदलाचा घातक परिणाम

06:33 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
गंगा  ब्रह्मपुत्रा  सिंधूवर हवामान बदलाचा घातक परिणाम
Advertisement

शहरांपासून गावांमधील जीवनावर पडणार प्रभाव

Advertisement

हवामान बदलाशी निगडित एक नवा अहवाल समोर आला आहे. यात गंगा, सिंधू, ब्रह्मपुक्षा समवेत दक्षिण आशियातील प्रमुख नद्यांच्या खोऱ्यांमध्ये हवामान बदलाचा धोकादायक प्रभाव दिसून येणार असल्याचे नमूद आहे. मानवी हालचाली आणि हवामानाच्या स्वरुपात बदल झाल्याने याच्या आसपासच्या भागांमधील सुमारे 100 कोटी लोकांसाठी गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशारा देण्यात आला आहे.  अहवालानुसार गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या ठिकाणी नदी खोरे व्यवस्थापनासाठी हवामानाच्या दृष्टीकोनातून लवचिक दृष्टीकोन अवलंबिला जाण्याची तत्काळ गरज आहे.

हिंदू कुश हिमालय दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील काही हिस्स्यांच्या ताज्या पाण्याचा स्रोत आहे. हिमालयातील बर्फ, हिमखंड आणि पावसामुळे येणारे पाणी आशियातील 10 सर्वात मोठ्या रिव्हर सिस्टीम्सना मदत पुरवितात.

Advertisement

सर्वसाधारणपणे भारतीय उपखंडात 600 दशलक्षापेक्षा अधिक लोकांसाठी पवित्र आणि आवश्यक मानल्या जाणारे गंगा खोरे वाढत्या पर्यावरणीय धोक्यांना सामोरे जात आहे. वेगाने होणारे औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि अन्य कारणांमुळे नदीच्या आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव पडला आहे. सांडपाणी आणि औद्योगिक कचऱ्यामुळे पाणी गंभीर स्वरुपात प्रदूषित झाले आहे. यामुळे लोकांचे आरोग्य आणि पर्यावरण दोघांसाठी धोका निर्माण झाला आहे. या हालचालींसोबत हवामान बदलाचा प्रभाव, विशेषकरून पूर आणि दुष्काळाच्या स्वरुपात आव्हाने वाढत आहेत.

विनाशकारी पूरयुक्त मान्सून

जलसंपदांच्या भरपाईसाठी महत्त्व बाळगणाऱ्या मान्सूनचा काळ आता धोकादायक पूर घेऊन येत आहे. हवामानसंबंधी हे धोके महिला, दिव्यांग आणि गरीब लोकांना प्रभावित करतात. अशाचप्रकारे भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीनमधील 268 दशलक्षापेक्षा अधिक लोकांसाठी जीवनरेषा असलेली सिंधू नदी हवामान बदलामुळे तणावात आहे. वाढते तापमान, अनियमित मान्सून आणि पर्यावरणाच्या स्थितीत झालेली घटन यामुळे या नदीचे खोरे संकटाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यात हवामान बदलाचा प्रभाव अत्यंत अधिक असल्याने अन्नसुरक्षा, उपजीविका आणि जलसुरक्षा कमजोर होतेय. मान्सूनमध्ये होत असलेल्या बदलाचा खोऱ्यातील स्थिरतेवर गंभीर प्रभाव पडतोय असे अहवालात नमूद आहे.

गरीब अन् वंचितांना फटका

ब्रह्मपुत्रा खोऱ्यात खासकरून सखल हिस्स्यात हवामान बदल पूर आणि दुष्काळासाठी स्थिती वाढविणार आहे. हिमनदी वितळण्याचा वेग वाढणार असल्याने पूर्ण भागात पाण्याच्या उपलब्धतेवर विशेष प्रभाव पडेल. सद्यकाळात नदीच्या खोऱ्यात कुठलाच मोठा जलपरिवर्तन नाही, परंतु धरण निर्मिती आणि हवामान बदलाच्या अनुमानांनुसार डाउनस्ट्रीम भागांमध्ये उन्हाळ्यात प्रवाहात घट होण्याची शक्यता आहे.

क्षेत्रीय सहकार्य महत्त्वाचे

हवामान बदलाच्या प्रभावांचे आंतरराष्ट्रीय स्वरुप पाहता अहवालात क्षेत्रीय सहकार्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे. एचकेएच कॉल टू अॅक्शन यासारखा पुढाकर सहकार्यात्मक कार्यासाठी एक रुपरेषा पुरवित आहे. अहवालात दक्षिण आशियातील प्रमुख नदी खोऱ्यांवर हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी समावेशक धोरणे अंमलात आणण्याची सूचना करण्यात आली आहे

Advertisement
Tags :

.