ट्रेंट रॉकेट्सकडून हरमनप्रित खेळणार
वृत्तसंस्था/ लंडन
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रित कौर हिने चालू वषीच्या क्रिकेट हंगामात होणाऱया द हंड्रेड महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत ट्रेंट रॉकेट्स संघाकडून खेळणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना सदर्न ब्रेव्ह संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे.
या स्पर्धेसाठी गुरुवारी ट्रेंट रॉकेट्सच्या फ्रँचाईजींनी हरमनप्रित कौरबरोबर नवा करार केला आहे. दरम्यान, स्मृती मानधनाबरोबरचा सदर्न बेव्हचा करार कायम ठेवण्यात आला आहे. द हंडेड ही स्पर्धा पहिल्यांदाच महिला विभागात खेळविली जात आहे. तर पुरुषांच्या विभागात पाकचे शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ यांना वेल्स फायरने खरेदी केले आहे. तर बाबर आझमवर मात्र कोणीही बोली लावली नाही. विंडीजचा माजी कर्णधार पोलार्ड, न्यूझीलंडचा बोल्ट हे खेळाडू या लिलावात विकले गेले नाहीत. 2023 ची पुरुषांची द हंडेड ही स्पर्धा 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.